IPL 2026 Points Table : आरसीबीने सामन्यासह मोठी संधी गमावली, गतविजेत्या टीमसह काय झालं?

IPL 2026 Points Table After 50th Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुरुवारी 7 मे रोजी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले.मात्र लखनौने गतविजेत्यांना आपल्या घरच्या मैदानात पराभूत केलं आणि विजय मिळवला.

IPL 2026 Points Table : आरसीबीने सामन्यासह मोठी संधी गमावली, गतविजेत्या टीमसह काय झालं?
LSG vs RCB IPL 2026 Points Table
Image Credit source: Bcci
| Updated on: May 08, 2026 | 9:27 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गुरुवारी 7 मे रोजी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात डीएलएसनुसार 9 धावांनी पराभव झाला. मिचेल मार्श याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनौने पावसामुळे प्रभावित झालेल्या या 19 षटकांच्या सामन्यात 3 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. मात्र आरसीबीला डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. आरसीबीनेही विजयासाठी जोरदार लढत दिली. मात्र आरसीबीचे प्रयत्न अवघ्या 9 धावांनी कमी पडले. आरसीबीला 19 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 203 धावाच करता आल्या. आरसीबीने या पराभवासह एकाना स्टेडियममध्ये लखनौ विरुद्ध सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी गमावली. इतकंच नाही तर आरसीबीने 2 गुण गमावले. तसेच आरसीबीला हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होण्याची संधी होती. मात्र आरसीबी पराभूत झाली आणि एका झटक्यात गतविजेत्या संघाला बऱ्याच बाबतीत फटका बसला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे हे जाणून घेऊयात.

आरसीबी तिसऱ्या स्थानी कायम

लखनौ विरुद्ध आरसीबी सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पॉइंट्स टेबमधील 10 संघांची स्थिती जैसे थे अशीच आहे. आरसीबीने हा सामना जिंकला असता तर ते थेट तिसऱ्या स्थानावरुन पहिल्या क्रमांकावर पोहचले असते. मात्र लखनौने आरसीबीला टेबल टॉपर होण्यापासून रोखलं. लखनौने ना आरसीबीला नंबर 1 होऊन दिलं ना स्वत:च्या स्थानात काही सुधार केला.

ताज्या आकडेवारीनुसार, आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. आरसीबीने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीचा 4 सामन्यांत पराभव झाला आहे. आरसीबीच्या खात्यात 12 गुण आहेत. आरसीबीला पराभवामुळे नेट रनरेटमध्ये फटका बसला आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा पराभवानंतर +1.234 असा झाला आहे जो सामन्याआधी +1.420 असा होता.

लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी

लखनौ विजयानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानीच आहे. लखनौने 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 7 सामने गमावले आहेत. लखनौच्या खात्यात 6 गुण झाले आहेत. लखनौचा नेट रनरेट हा -0.934 असा आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

शुक्रवारी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना

दरम्यान शुक्रवारी 8 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना होणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

Follow Us