AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RCB : दिग्वेश राठीने गेम फिरवला, लखनौचा तिसरा विजय, आरसीबीवर 9 धावांनी मात

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru, IPL 2026 Match Result : लखनौ सुपर जायंट्सने 19 व्या मोसमात घरच्या मैदानात आरसीबी विरुद्ध सलग 8 पराभानंतर अखेर विजय मिळवला आहे. मिचेल मार्श आणि दिग्वेश राठी या दोघांनी आरसीबच्या विजयात प्रमुख योगदान दिलं,

LSG vs RCB : दिग्वेश राठीने गेम फिरवला, लखनौचा तिसरा विजय, आरसीबीवर 9 धावांनी मात
Digvesh Rathi LSG vs RCB IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 08, 2026 | 6:26 AM
Share

मिचेल मार्श याने केलेलं शतक आणि दिग्वेश राठी याने शेवटच्या ओव्हरमधील केलल्या चिवट बॉलिंगच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने अखेर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात पराभवाची मालिका खंडीत केली आहे. लखनौसमोर होम ग्राउंड एकाना स्टेडियममध्ये मोसमातील 50 व्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान होतं. लखनौला या मोसमातील प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत आरसीबी विरुद्ध जिंकायचंच होतं. त्यामुळे लखनौच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष होतं. मात्र सातत्याने अपयशी ठरणाऱ्या लखनौने गतविजेत्या संघाला पराभवाची धुळ चारून 2 गुणांची कमाई केली. लखनौने आरसीबीवर डीएलएसनुसार 9 धावांनी विजय मिळवला आहे.

मिचेल मार्श याने ठोकलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनौने आरसीबीसमोर पावसाने प्रभावित झालेल्या 19 ओव्हरच्या सामन्यात 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने या धावांचा शानदार पाठलाग केला. त्यामुळे आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. मैदानात आरसीबीकडून स्फोटक फलंदाज रोमरियो शेफर्ड आणि कृणाल पंड्या ही सेट जोडी होती. त्यामुळे आरसीबीच्या विजयाची शक्यता होती. मात्र लखनौचा कॅप्टन ऋषभ पंत याने फिरकीपटू दिग्वेश राठी याला मोठ्या विश्वासाने शेवटची ओव्हर टाकायला दिली. राठीनेही कॅप्टन पंतचा विश्वास सार्थ ठरवला. राठीने यशस्वीपणे 20 धावांचा बचाव केला. राठीने अवघ्या 9 धावा दिल्या. त्यामुळे आरसीबीला 19 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 203 धावाच करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे सामना आपल्या नावावर केला.

स्कोअरकार्ड

एकाना स्टेडियममधील आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेत एकाना स्टेडियममध्ये 5 पैकी 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. तर पहिले बॅटिंग करताना 2 संघाने विजय मिळवला आहे. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे. तसेच लखनौमध्ये आरसीबी एलएसजीवर वरचढ होती. आरसीबीने एलएसजीला लखनौत झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभूत केलंय. त्यामुळे लखनौसमोर घरच्या मैदानात आरसीबी विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान होतं. लखनौने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आणि विजय मिळवला.

लखनौचा तिसरा विजय, आरसीबीची निराशाजनक कामगिरी

दरम्यान लखनौने आरसीबीला पराभूत करुन 19 व्या मोसमातील आपला तिसरा विजय साकारला. लखनौच्या खात्यात 10 सामन्यानंतर आता 6 गुण झाले आहेत. तर आरसीबीचा हा या मोसमातील एकूण चौथा आणि सलग दुसरा पराभव ठरला. आरसीबीच्या खात्यात 10 सामन्यानंतर 12 गुण आहेत. मात्र त्यानंतरही आरसीबीकडे लखनौपेक्षा प्लेऑफची अधिक संधी आहे. तर लखनौने उर्वरित 4 सामने जिंकले तरी त्यांचे 14 गुणच होतील. त्यामुळे आता लखनौची उर्वरित सामन्यात कशी कामगिरी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?