AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मिचेल मार्शने 49 चेंडूत ठोकलं शतक, या पर्वातील दहावा शतकवीर

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने लखनौच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण या संधीचं सोनं मिचेल मार्शने शतक ठोकून केलं.

IPL 2026: मिचेल मार्शने 49 चेंडूत ठोकलं शतक, या पर्वातील दहावा शतकवीर
IPL 2026: मिचेल मार्शने 49 चेंडूत ठोकलं शतक, या पर्वातील दहावा शतकवीरImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2026 | 10:04 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 50व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला. कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि लखनौ सुपर जायंट्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. वारंवार पराभवाच्या मानसिकेत असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने आक्रमक सुरूवात केली. मिचेल मार्श आणि आर्शीन कुलकर्णी यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. आर्शिन कुलकर्णी 24 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. पण मिचेल मार्शचा झंझावात सुरूच होता. त्याने आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 200पेक्षा अधिकचा होता. त्यानंतरही त्याने आक्रमक बाणा कायम ठेवला आणि पावसामुळे सामना थांबवला गेला.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात 14 षटकांचा खेळ झाला तेव्हा पावसाला सुरूवात झाली. तिथपर्यंत मिचेल मार्शने 51 चेंडूत 9 चौकार आणि 9 षटकार मारत नाबाद 107 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्स संघ चांगल्या स्थितीत आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून या पर्वात शतक ठोकणारा मिचेल मार्श हा पहिला खेळाडू ठरला आहे.इतकंच काय तर लखनौ सुपर जायंट्साठी वेगवान शतक ठोकण्याचा मानही मिळवला आहे. ऋषभ पंतने 54 चेंडूत शतक ठोकलं होतं. मिचेल मार्शचं हे आयपीएलमधील दुसरं शतक आहे. यापूर्वी 2025 मध्य गुजरात टायटन्सविरुद्ध 117 धावा केल्या होत्या.

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकी खळी करणारा दहावा खेळाडू ठरला आहे. मिचेल मार्शच्या आधी नऊ खेळाडूंनी शतक ठोकलं आहे. त्यात संजू सॅमसनने दोन शतकं ठोकली आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना संजू सॅमसनने दोन शतकं ठोकली आहेत. तर केएल राहुल, अभिषेक शर्मा, रयान रिकल्टन, क्विंटन डीकॉक, कूपर कोनोल्ली, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी एक शतक ठोकलं आहे. मिचेल मार्शच्या शतकासह या पर्वात आता 11 शतकांची नोंद झाली आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?