AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : मुंबईची पंजाब विरुद्ध बॉलिंग, प्लेइंग ईलेव्हनमधून रोहित-सूर्या आऊट, बुमराह कॅप्टन

Punjab Kings vs Mumbai Indians, Toss and Playing 11 : मुंबई इंडियन्स 19 व्या मोसमात पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात नव्या कॅप्टन्सह मैदानात उतरणार आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह मुंबईचं नेतृत्व करणार आहे.

PBKS vs MI : मुंबईची पंजाब विरुद्ध बॉलिंग, प्लेइंग ईलेव्हनमधून रोहित-सूर्या आऊट, बुमराह कॅप्टन
Shreyas Iyer and Jasprit Bumrah PBKS vs MIImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 14, 2026 | 8:11 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 57 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेत एचपीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. मुंबईने धर्मशालेत पंजाब विरुद्ध चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई आणि पंजाबने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

धर्मशालेतील आकडेवारी

आयपीएल स्पर्धेत धर्मशालेतील या स्टेडियममध्ये आतापर्यंत 2023 पासून एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. या 6 पैकी 4 सामन्यात पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर चेजिंग करणाऱ्या टीमचा 2 वेळा विजय झाला आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

पंजाबच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये हरप्रीत ब्रार, अझमतुल्लाह ओमरझई आणि झेव्हीयर बार्टलेट या तिघांचं कमबॅक झालं आहे. तर मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अल्लाह गजनफर हे प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाहीत. त्यामुळे शेरफेन रुदरफोर्ड आणि शार्दुल ठाकुर या दोघांचं पुनरागमन झालं आहे. तर सूर्यकुमार यादव याने वैयक्तिक कारणामुळे सामन्यातून माघार घेतली आहे. अल्लाहला बाहेर करण्यात आलं आहे. तर रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे.

जसप्रीत बुमराह याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा

हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र अवघ्या काही दिवसांआधी सूर्याला कन्यारत्न प्राप्त झालं. सूर्याने बहुतेक त्यामुळेच पंजाब विरुद्धच्या सामन्यातून माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुमराहचं यासह कर्णधार म्हणून पदार्पण झालं आहे.

पंजाब प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला ओमरझई, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (कॅप्टन) आणि रघु शर्मा.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ