AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडताच कर्णधार बदलला, झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 58व्या समन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी औपचारिक आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहे. पण या सामन्यात एक मोठा बदल करत जसप्रीत बुमराहकडे जबाबदारी सोपवली आहे.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडताच कर्णधार बदलला, झालं असं की..
IPL 2026 : मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडताच कर्णधार बदलला, झालं असं की..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 14, 2026 | 7:46 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. संघात दिग्गज खेळाडू असूनही या स्पर्धेत दैना झाली. या स्पर्धेतून आऊट होणारा पहिला संघ ठरला. पाच वेळा जेतेपद मिळवणाऱ्या संघाची दैना पाहून क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्स जेतेपदापासून दूर राहिली आहे. असं असताना मुंबई इंडियन्स या स्पर्धेत तिसरा कर्णधार दिला आहे. तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने काही सामन्यांना मुकला आहे. त्यामुळे त्याची जागा सूर्यकुमार यादवने घेतली होती. पण सूर्यकुमार यादव खासगी कारणामुळे पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळत नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आली आहे. मुंबई इंडियन्सकडून गेली 13 वर्षे जसप्रीत बुमराह खेळत आहे. त्यामुळे 13 वर्षांनी त्याला ही संधी मिळाली आहे. 13 वर्ष आणि 156 व्या सामन्यानंतर मुंबईकडून नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कर्णधारपदाची भूमिका बजावताना पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकली.

जसप्रीत बुमराह म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करायचे ठरवले आहे. आम्ही मागचा सामना पाहिला आणि आम्हाला वाटले की, येणाऱ्या थंडीमुळे खेळपट्टी स्थिर होईल. एमआयचा कर्णधार होण्यापूर्वी मी कसोटी कर्णधार होईन असे मला वाटले नव्हते . आमच्याकडे अजून तीन सामने शिल्लक आहेत आणि आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आहे, तसेच काही संघांना धक्का द्यायचा आहे. सूर्या वैयक्तिक कारणांमुळे येथे नाही आणि अल्लाहसुद्धा सोबत नाही.’ जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय आणि इंग्लंड, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नाही. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवणारा दहावा खेळाडू आहे. या यादीत हरभजन सिंग, शॉन पोलॉक, ड्वेन ब्राव्हो, रिकी पाँटिंग, कायरान पोलार्ड, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.

नाणेफेकीचा कौल गमावल्यानतंर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. खेळपट्टी थोडी कोरडी दिसते आहे. खेळपट्टी कशी खेळेल हे अजून माहित नाही, त्यामुळे त्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आहोत. काय चुकले याचा विचार करणे आपण थांबवले पाहिजे. आपण चांगल्या स्थितीत राहण्यावर आणि सकारात्मक मानसिकता ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट आणि अझमतुल्ला ओमरझाई संघात आले आहेत ‘

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ