IPL 2026 Playoff Scenario: आता प्रत्येक मॅच निर्णायक, प्लेऑफसाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागणार?
IPL 2026 Playoff Scenario: आयपीएलच्या 19 व्या मोसमातील 50 सामने पूर्ण झाले आहेत. मात्र त्यानंतरही एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. तसेच एकही संघ बाहेरही झालेला नाही. त्यामुळे 10 संघांचं आव्हान कायम आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आता प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफसाठी चुरस वाढली आहे. आता एकही पराभव स्पर्धेतून बाहेर पडण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे 10 संघ आणखी ताकदीने मैदानात उतरणार आहेत. एकूण 10 पैकी 4 संघांचीच प्लेऑफमध्ये निवड होते. त्यामुळे या 4 जागांसाठी चुरस आहे. तसेच 50 सामन्यानंतरही कोणताही संघ अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही. त्यामुळे या 4 जागांसाठी आणखी खेचाखेची आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असतो. मात्र सध्या टॉप 4 साठी लढाई आहे. त्यामुळे प्रत्येक संघासाठी आता करो या मरो अशी स्थिती आहे. कारण एका पराभवामुळे समीकरण बदलणार आहे. आयपीएल 2026 मधील 50 व्या सामना लखनौ सुपर जायंट्ससाठी करो या मरो असा होता. एलएसजीने एकाना स्टेडियममध्ये आरसीबीवर 9 धावांनी विजय मिळवून आपलं प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. लखनौने 2 गुणांची कमाई करण्यासह आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी...