IPL 2026 Points Table : घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप

IPL 2026 Points Table : सनरायजरर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सचा 47 धावांनी धुव्वा उडवला. हैदराबादला 47 धावांमुळे नेट रनरेटमध्ये तगडा फायदा झालाय. हैदराबाद या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

IPL 2026 Points Table : घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप
SRH Eshan Malinga IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 22, 2026 | 3:41 AM

सनरायजर्स हैदराबादने राजीव गांधी स्टेडियममध्ये पाहुण्या दिल्ली कॅपिट्ल्सवर 21 एप्रिलला 47 धावांनी विजय मिळवला. हैदराबादने दिल्लीसमोर 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्लीने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतिकार केला. मात्र त्याआधीच  दिल्लीचा पराभव निश्चित झाला होता.  दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 195 धावांपर्यंतच पोहचता आलं. अशाप्रकारे हैदराबादने या मोसमात विजयी हॅट्रिक पू्र्ण करत एकूण चौथा सामना जिंकला. हैदराबादला या विजयासह फायदा झाला आहे. तर दिल्ली पराभवानंतर आपल्या स्थानी कायम आहे. मात्र ज्या राजस्थान रॉयल्सचा हैदराबाद-दिल्ली सामन्यासह काही संबंध नव्हता त्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. नक्की काय झालंय? हे जाणून घेऊयात.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती काय?

हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमधील टॉप 2 मध्ये काहीही बदल झालेला नाही. पंजाब किंग्स पहिल्या स्थानी कायम आहे. पंजाब 10 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारी पहिलीच टीम ठरली आहे. गतविजेता आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबादला विजयामुळे एका स्थानाचा फायदा झालाय. हैदराबाद चौथ्या क्रमाकांवरुन तिसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, हैदराबादच्या खात्यात 7 सामन्यांनंतर 8 गुण आहेत. हैदराबादने 7 पैकी 4 सामने जिंकलेत. तर हैदराबादचा 3 वेळा पराभव झाला आहे. हैदराबादला दिल्ली विरूद्धच्या सामन्यानंतर नेट रनरेटमध्येही फायदा झाला आहे. हैदराबादचा नेट रनरेट आता +0.820 असा झाला आहे जो सामन्याआधी +0.566 असा होता. हैदराबादने तिसऱ्या स्थानी झेप घेतल्याने राजस्थानला फटका बसला आहे. राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. राजस्थानने 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. राजस्थानच्या खात्यात 8 गुण आहेत. तर राजस्थानचा नेट रनरेट हा +0.599 इतका आहे. दिल्ली सामन्याआधी आणि सामन्यानंतरही पाचव्या स्थानी कायम आहे.

मुंबई कितव्या स्थानी?

गुजरात 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यात प्रत्येकी 4-4 गुण आहेत.चेन्नई आणि लखनौच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने मुंबईने सातव्या स्थानी आहे. त्यानंतर चेन्नई आठव्या आणि लखनौ नवव्या क्रमांकावर आहे. तर केकेआर दहाव्या स्थानी आहे.

बुधवारी कुणाचा सामना?

दरम्यान बुधवारी 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. राजस्थान आणि लखनौ दोन्ही संघांचा हा या 19 व्या मोहिमेतील सातवा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावलाय. त्यामुळे दोघांसमोर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

Follow Us