अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पुन्हा झिरोवर आऊट?

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेत्या आरसीबी संघात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्याच षटकात आरसीबीने जोरदार अपील केली आणि समोर होता अभिषेक शर्मा...

अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पुन्हा झिरोवर आऊट?
अभिषेक शर्मासमोर आरसीबीची पहिल्याच बॉलवर जोरदार अपील, ओपनर पु्न्हा झिरोवर आऊट?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 28, 2026 | 8:09 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम वाटेला फलंदाजी आली. आरसीबीच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात आली. ही सर्वात आक्रमक जोडी म्हणून गणली जाते. त्यामुळे सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागून होतं. कारण अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही खास करू शकले नव्हते. अभिषेक शर्माला तर पहिल्या तीन सामन्यात खातंही खोलता आलं नव्हतं. पण अंतिम सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली होती. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष होतं. आरसीबीकडून पहिलं षटक टाकण्यासाठी जेकब डफी आला होता.

आरसीबी विरूद्ध हैदराबाद सामन्यातील पहिल्या षटकात बरंच काही घडलं असं म्हणायला हरकत नाही. या षटकाच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी ट्रेव्हिस हेड समोर होता. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत अभिषेक शर्माला स्ट्राईक दिली. पहिल्याच चेंडूवर फटका मारताना अभिषेक शर्मा चुकला. पण विकेटकीपर जितेश शर्माने झेल घेतल्याची अपील केली. कर्णधार रजत पाटीदारने त्याच्या अपील दाद देत रिव्ह्यू घेतला. पण हा रिव्ह्यू वाया गेल्या. कारण बॅट आणि बॉलचा काही संपर्कच नव्हता. त्यामुळे आरसीबीचा पहिलाच रिव्ह्यू वाया गेला. पण चेंडू इतक्या जवळून गेला होती की काही क्षण आऊट की काय असं वाटलं होतं.  नाही तर आयपीएलची सुरूवात शून्यावर झाली असती. चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्माने षटकार मारत आणि खातं खोललं. तर पाचवा आणि सहावा चेंडू निर्धाव गेला.

दुसरं षटकं टाकण्यासाठी अनुभवी भुवनेश्वर कुमार आला होता. त्याने अभिषेक आणि ट्रेव्हिस हेडला आक्रमक फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. या षटकात 10 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडने चौकार मारला आणि जेकब डफीचं षटक खेळण्यासाठी समोर अभिषेक शर्मा आला. पहिला चेंडू निर्धाव गेला. पण दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याचा नादात झेल बाद झाला. जितेश शर्माने झेल पकडण्यात कोणतीच चूक केली नाही. अभिषेक शर्मा 8 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेडला या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चालतं केलं.

Follow Us