IPL 2026 : नियम म्हणजे नियम, बीसीसीआयचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय; खेळाडूंना झटका! काय झालं?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत खेळाडूंसोबत त्यांचे नातेवाईक असतात. खेळाडूंचे नातेवाईक आणि इतर मुद्द्यांचा विचार करुन बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमासाठी नवी नियमावली आणली आहे. जाणून घ्या.

IPL 2026 : नियम म्हणजे नियम, बीसीसीआयचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय; खेळाडूंना झटका!  काय झालं?
Tata Ipl Trophy
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 23, 2026 | 10:32 PM

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचा एक एक दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं चाहत्यांची उत्सूकता वाढत आहे. खेळाडूही शेवटचे काही दिवस बाकी असल्याने जोरदार सराव करत आहेत. तसेच टीम मॅनेजमेंट खेळाडूंकडून कसून सराव करुन घेतला जात आहे. प्रत्येक मोसमाआधी बीसीसीआयकडून संघांसाठी काही नियमावली तयार करण्यात येते. तसेच नव्या मोसमापासून एखाद्या नियमाची अंमलबजावणी केली जाते. बीसीसीआयकडून यंदा 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत खेळाडू, त्यांचे कुटुंबिय आणि इतर नियमांचा उल्लेख आहे. त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आयपीएलच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व संघ तयारी करत आहेत. आयपीएल स्पर्धा जवळपास 2 महिने खेळवण्यात येते. त्यामुळे बहुतांश खेळाडूंचे कुटुंबिय या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला उपस्थित असतात. एकूण 2 महिन्यांचा कालावधी असल्याने बीसीसीआयकडून कुटुंबियांना सोबत ठेवण्याची परवानगी असते. मात्र त्यानंतरही बीसीसीायकडून खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीत खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी घालण्यात आलेल्या बंधनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

कुटुंबियांना स्वतंत्र गाडी

क्रिकबझच्या रिपोर्ट्समध्ये बीसीसीआयच्या या नियमावलीबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार सरावाच्या दिवशी खेळाडूंनी फ्रँचायजीच्या बसने स्टेडियमपर्यंत पोहचायचं आहे, याबाबतची माहिती सर्व फ्रँचायजींना देण्यात आली आहे. मात्र त्याच बसमधून खेळाडूंना आपल्या कुटुंबियांना सोबत आणता येणार नाही. तसेच खेळाडूंच्या कुटुंबियांना मैदानात परवानगी नसेल. खेळाडूंच्या कुटुंबियांना स्टेडियममधील हॉस्पिटलॅटी एरियातून सराव सामने पाहता येतील.

सरावाबाबत नियम माहितीय?

तसेच बीसीसीआयने सराव सत्र आणि ड्रेसिंगबाबत काही बंधन घातली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामन्याच्या दिवशी कोणत्याही संघाला सराव सत्राचं आयोजन करता येणार नाही. तसेच खेळपट्टी जवळ फिटनेस टेस्ट घेता येणार नाही.

ऑरेंज आणि पर्पल कॅप असलेल्या खेळाडूला सामन्यादरम्यान ती टोपी घालावीच लागेल. खेळाडूला अगदी संपूर्ण सामन्यात ती टोपी घालता आली नाही तरी सुरुवातीचे 2 ओव्हर बंधनकारक आहेत. खेळाडूला पहिले 2 ओव्हर खेळाडूला ती टोपी घालावीच लागणार आहे.

तसेच पोस्ट मॅच प्रेझेंटेनेशनमध्ये खेळाडूंना गोल टोपी घालून जाता येणार नाही. तसेच स्लीवलेस जर्सीसह पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला जाता येणार नाही. खेळाडूकडून नियमाचं उल्लंघन केल्यास त्याला पहिल्यांदा सूचन करण्यात येईल. मात्र पुन्हा तशीच चूक केल्यास त्या खेळाडूवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

Follow Us