
सनरायजर्स हैदराबाद आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना शनिवारी 28 मार्च रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यासाठी कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. आरसीबी गतविजेता आहे. त्यामुळे आरसीबीचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इशान किशन कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादला विजयी करण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? हे जाणून घेऊयात.
उभयसंघातील सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हैदराबादबादपेक्षा आरसीबीला सपोर्ट जास्त असेल, हे वेगळं सागंण्याची गरज नाही. घरच्या मैदानात सामने होत असल्याने चाहत्यांना खास करुन अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याकडून मोठ्या आणि चाबूक खेळीची आशा असणार आहे. तसेच कॅम डेव्हिड आणि रोप्टन रजत पाटीदार टीमारियो शेफर्ड या विस्फोटक फलंदाजांकडून मोठी खेळी अपेक्षित असणार आहे.
तसेच सनरायजर्स हैदराबादच्या संघातही तोडीसतोड आणि आक्रमक फलंदाज आहेत. एसआरएचटक फलंदाज आहेत. टीममध्ये अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन हे नावाजलेले विस्फोत्यामुळे चाहत्यांना पहिल्या सामन्यात हायस्कोरिंग सामना पाहायला मिळेल, अशी चिन्हं दिसत आहेत.
तर दोन्ही संघात गोलंदाजही एकमेकांना तोडीसतोड आहेत. आरसीबीच्या गोटात भुवनेश्वर कमार रोमरियो शेफर्ड, टीम डेव्हिड आणि सुयश शर्मा आणि इतरांवर गोलंदाजीचा मदार असू शकते.
तर सनरायजर्स हैदराबादकडे शिवम मावी, नितीश कुमार रेड्डी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स आणि इतर वेगवान/फिरकी गोलंदाज आहेत.त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चढाओढ पाहायला मिळू शकते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, कृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि जेकब डफी.
सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : हेनरिक क्लासेन, ईशान किशन (कर्णधार), अनमोलप्रीत वर्मा, ट्रेव्हीस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टोन, हर्षल पटेल, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स आणि शिवम मावी.