
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘रन’संग्राम पाहायला मिळणार आहे. 5 राज्यातील निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून पहिल्या टप्प्याचंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल स्पर्धेत दररोज अनेक विक्रम होतात जे मोडीतही निघतात. क्वचित अपवाद वगळले तर गोलंदाजांची आयपीएलमध्ये धुलाई होतेच होते. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.