IPL 2026: वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करताना काय चुकतं? त्यामुळे गोलंदाजांना बसतो फटका, जाणून घ्या

Vaibhav Sooryavanshi vs Fast Bowlers: आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची धास्ती भल्याभल्या गोलंदाजांनी घेतली आहे. समोर कोणता बॉलर आहे हे न पाहता वैभव सूर्यवंशी त्यांच्यावर तुटून पडतो. त्याने या स्पर्धेत वेगवान गोलंदाजांना लक्ष्य केलं आहे. त्यात त्याला यशही मिळालं आहे.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करताना काय चुकतं? त्यामुळे गोलंदाजांना बसतो फटका, जाणून घ्या
IPL 2026: वैभव सूर्यवंशीला गोलंदाजी करताना काय चुकतं? त्यामुळे गोलंदाजांना बसतो फटका, जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 27, 2026 | 4:58 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान या उक्तीप्रमाणे वैभव सूर्यवंशीची कामगिरी राहिली आहे. पहिल्या चेंडूपासून त्याचा आक्रमक बाणा दिसून येतो. इतकंच काय चेंडू मैदानाबाहेर मारण्याची त्याची ताकद आहे. वैभव सूर्यवंशीने वेगवान गोलंदाजांना या स्पर्धेत धू धू धुतलं आहे. टप्पा कुठेही टाकला तरी त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात वैभव सूर्यवंशी तरबेज झाला आहे. त्यामुळे नेमका टप्पा कुठे टाकावा असा प्रश्न गोलंदाजांना पडतो काही चेंडूंचे टप्पे त्याच्या रडारमध्ये टाकणं म्हणजे गुन्हाच आहे. जर टप्पा त्या भागात पडला तर षटकार किंवा चौकार बसलाच समजा. त्यात पावरप्लेमध्ये दोन खेळाडू बाहेर असतात त्यामुळे त्याचा फायदा वैभव सूर्यवंशी बरोबर घेतो. त्यात वैभव सूर्यवंशीला आखुड टप्प्याची गोलंदाजी करण्याची चूक वेगवान गोलंदाज करत आहे. या चेंडूवर फटका मारताना वैभव सूर्यवंशी चुकतो असा समज आहे. पण त्यावरही तो जोरदार प्रहार करतो.

आयपीएल 2026 स्पर्धेत आखुड टप्प्याच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीने 358 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने 40 चेंडूत 16 षटकार मारले आहे. तर फुल लेंथ चेंडूवर त्याचा आत्मविश्वास वाखण्याजोगा आहे. त्याने फुल लेंथच्या 34 चेंडूवर 341 च्या स्ट्राईकने धावा केल्या आहेत. यात त्याने 10 षटकार मारले आहे. चेंडू पुढच्या टाकला तर वैभव सूर्यवंशी आरामात लाँग ऑन किंवा लाँग ऑफच्या दिशेने वरून फटकावतो. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर त्याचा स्ट्राईक रेट मात्र 200चा आहे. काही चेंडूंवर खेळताना वैभव सूर्यवंशीला अडचण आली आहे. फुल टॉस चेंडू वैभव सूर्यवंशी सावधपणे खेळतो. या चेंडूवर त्याला काही अडचण असल्याचं दिसत आहे.

फुल टॉस चेंडू आला तर इतर फलंदाज थेट चेंडू सीमेपार नेण्याची ताकद ठेवतात. पण वैभव सूर्यवंशीची या चेंडूवर आकडेवारी आश्चर्यकारक आहे. त्याने फुल टॉस लेंथ चेंडूवर 38 च्या स्ट्राईकने धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल 2026 स्पर्धेत फुल टॉस चेंडूवर एकही षटकार मारलेला नाही. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीला फसवण्याचं सर्वात मोठं हत्यार हे यॉर्कर आहे. कारण यॉर्कर चेंडूवर त्याने आतापर्यंत एकही षटकार मारलेला नाही. त्यामुळे त्याच्यासमोर अचूक यॉर्कर टाकणं आवश्यक आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीविरुद्ध फुल टॉस आणि यॉर्कर चेंडू प्रभावी ठरू शकतो असं आकडेवारी सांगत आहे.

Follow Us