IPL 2027 च्या लिलावासाठी 1220 खेळाडूंची नोंदणी, पण संघांकडे फक्त 66 जागा शिल्लक; BCCI कडून अधिकृत यादी जाहीर, कोणत्या देशातून किती खेळाडू?

BCCI Announces Official List of Cricketers: आयपीएल ऑक्शनसाठी जगभरातून खेळाडूंनी नोंदणी केली आहे. IPL 2027 च्या लिलावासाठी BCCI ने मोठी अपडेट दिली आहे.

IPL 2027 च्या लिलावासाठी 1220 खेळाडूंची नोंदणी, पण संघांकडे फक्त 66 जागा शिल्लक; BCCI कडून अधिकृत यादी जाहीर, कोणत्या देशातून किती खेळाडू?
IPL Auction 2027 BCCI Official List
| Updated on: Nov 25, 2026 | 4:26 PM

आयपीएल 2027 च्या खेळाडू लिलावासाठी एकूण 1,220 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे सांगितले की, यामध्ये 939 भारतीय खेळाडू आणि 17 देशांतील 281 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 184 खेळाडूंना कायम ठेवले आहे. एकूण 66 जागा अजून भरायच्या आहेत. बीसीसीआयने आयपीएल 2027 खेळाडू लिलावासाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक देशातील खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

यामध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या आणि न खेळलेल्या भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. लिलावासाठी एकूण 184 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या खेळाडूंची संख्या 994 आहे. याव्यतिरिक्त, 42 खेळाडू सहयोगी राष्ट्रांमधील आहेत. यांपैकी 925 भारतीय असून त्यात आयपीएलच्या हंगामांमध्ये खेळलेल्या 127 खेळाडूंचा समावेश आहे.

Loading...

लिलावासाठी नोंदणी केलेल्या परदेशी खेळाडूंची सर्वाधिक संख्या ऑस्ट्रेलियाची आहे. ऑस्ट्रेलियातील एकूण ५३ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो, जिथे ४० खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजमधील ३६ आणि न्यूझीलंडमधील २५ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बीसीसीआयने प्रत्येक देशातून नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या संख्येची यादी, श्रेणींच्या यादीसह प्रसिद्ध केली आहे. खेळाडूंच्या नावांची यादी कोणत्या तारखेला प्रसिद्ध केली जाईल, हेदेखील मंडळाने जाहीर केले आहे.

आयपीएल ऑक्शनसाठी यंदा तब्बल 1,220 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बीसीसीआयने या खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली असून त्यांचे सहा गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 14 कॅप्ड भारतीय खेळाडू, 170 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू, असोसिएट देशांमधील 42 खेळाडू, मागील आयपीएल हंगामात खेळलेले 127 अनकॅप्ड भारतीय खेळाडू, 798 अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि 69 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

देशानुसार नोंदणीचा विचार केला, तर सर्वाधिक 939 खेळाडू भारतातून आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून 53, दक्षिण आफ्रिकेतून 40, वेस्ट इंडिजमधून 36, न्यूझीलंडमधून 25, अफगाणिस्तानमधून 23, श्रीलंकेतून 21 आणि इंग्लंडमधून 16 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याशिवाय बांगलादेशचे 12, अमेरिकेचे 13, यूएई आणि नेपाळचे प्रत्येकी 10, आयर्लंडचे 7, झिम्बाब्वेचे 6, नेदरलँडचे 3, तर कॅनडा, जपान आणि स्कॉटलंडमधील प्रत्येकी 2 खेळाडू ऑक्शनसाठी रिंगणात असणार आहेत.

आयपीएल लिलाव 2027 साठी नोंदणी केलेल्या खेळाडूंमधून फ्रँचायझी अंतिम खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या खेळाडूंची नावे सादर करतील. खेळाडूंची नावे आणि त्यांच्या मूळ किमतींसह अंतिम लिलाव यादी 4 डिसेंबर 2026 रोजी जाहीर केली जाईल. हा लिलाव 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us