IPL 2024 Auction | दोन फ्रेंचायजींमध्ये चुरस, किंमत वाढत होती, पण अखेरीस ‘या’ खेळाडूच 7.25 कोटी रुपयाच नुकसान

IPL 2024 Auction | त्याला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजीमध्ये चुरस होती. सतत किंमत वाढत होती. मग नुकसान कसं झालं?. बेस प्राइसपेक्षा दुप्पट किंमत मोजून त्याला विकत घेतलं.

IPL 2024 Auction | दोन फ्रेंचायजींमध्ये चुरस, किंमत वाढत होती, पण अखेरीस या खेळाडूच 7.25 कोटी रुपयाच नुकसान
IPL Auction 2024
| Updated on: Dec 19, 2023 | 3:34 PM

IPL 2024 Auction | इंडियन प्रीमियर लीगच्या पुढ़च्या सीजनसाठी लिलाव सुरु झालाय. पहिल्या सेटमध्ये अनेक मोठी नाव होती. यात एक नाव इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकच होतं. ब्रूकची आयपीएल लिलावात बेस प्राइस 2 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4 कोटी रुपयांना विकत घेतलं. इतकी कोटीची कमाई करुनही हॅरी ब्रूकच नुकसान झालं. ब्रूकला 4 कोटी रुपये मिळाले. पण त्याच 7.25 कोटी रुपयाच नुकसान झालं.

ब्रूकला विकत घेण्यासाठी दोन फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून आली. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये ब्रूकसाठी स्पर्धा होती. ब्रूकची किंमत सतत वाढत होती. पण अखेरीस राजस्थानने हार मानली. दिल्लीने दुप्पट किंमत मोजून ब्रूकला आपल्यासोबत जोडलं.

असं झालं नुकसान

असं होऊनही ब्रूकच स्वत:च 7.25 कोटी रुपयांच नुकसान झालं. ब्रूक मागच्यावर्षी पहिल्यांदा आयपीएलमध्ये दाखल झाला. मागच्यावर्षी सुद्धा त्याच्यासाठी मोठी बोली लागली होती. सनरायजर्स हैदराबादने त्याला 13.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. ब्रूकला मागच्यावर्षी जो पैसा मिळाला, त्या तुलनेत या वर्षी त्याच नुकसान झालं. हैदराबादने त्याला रिटेन केलं नाही. अन्यथा 13.25 कोटी रुपये मिळाले असते. पण असं झालं नाही. त्यामुळे ब्रूकने आपल नाव लिलावासाठी दिलं. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. ब्रूकने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये 11 सामन्यात 21.11 च्या सरासरीने 190 धावा केल्या होत्या.


भारतीय फॅन्सचा केलेला अपमान

ब्रूकला इतका पैसा मिळून पण तो कमाल करु शकला नव्हता. भारतीय फॅन्स त्याच्यावर नाराज होते. हैदराबादने त्याच्यावर आपले पैसे वाया घालावले, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर ब्रूकने शतक ठोकलं होतं. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यावेळी ब्रूक म्हणाला होता की, मी माझ्या शतकाने भारतीय फॅन्सला प्रत्युत्तर दिलय. त्यावर ब्रूकला ट्रोल करण्यात आलं होतं.