
आयपीएल म्हणजे भारतात एक उत्सवच झाला आहे. प्रसिद्ध क्रिकेट लीगमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा समावेश होतो. पाण्यासारखा पैसा म्हणजे करोडो रूपयांची उलाढाल या लीगदरम्यान होते. क्रिकेट वर्ल्ड कप पेक्षाही भारतातील क्रिकेट चाहते आयपीएलची उत्सुकतेने वाट पाहतात. भारतामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि रात्री टीव्हीवर आयपीएलचे सामने हे एक समीकरणच झालं आहे. या प्रसिद्ध लीगमध्ये आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रूपये मिळतात. पण प्रत्येक संघासाठी ही रक्कम शुल्लक आहे. कारण संघातील खेळाडूंना लिलावातच करोडो रूपयांमध्ये विकत घेतलं जातं. मग आयपीएल टीम मालकांना करोडो रूपये खर्च करून काय फायदा? तुम्ही फक्त आयपीएल पाहिलीत मात्र त्यामागचं अर्थकारणही समजून घ्या. आयपीएल बिझनेस मॉडेल आयपीलएलबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार हे बीसीसीआयकडे आहेत. बीसीसीआय ही सरकारी संख्या नसून खासगी संस्था आहे. आयसीसीने बीसीसीआयच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या संस्थेकडे हक्क दिले तर बीसीसीआय काही करू शकत नाही. मात्र बीसीसीआयचा दबदबा जगभरातील क्रिकेट मंडळात...