Jos Buttler : ती आली अन् बटलरचा हात पकडत थेट म्हणाली I Love You, व्हिडीओ एकदा पाहाच

राजस्थान रॉयल्स संघाचा आक्रमक सलामीवीर जोस बटलर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याला एका चाहतीने  मैदानात आय लव्ह यू म्हटलं आहे.

Jos Buttler : ती आली अन् बटलरचा हात पकडत थेट म्हणाली I Love You, व्हिडीओ एकदा पाहाच
| Updated on: Apr 17, 2023 | 9:17 PM

अहमदाबाद : आयपीएलच्या थराराला आता सुरूवात झाली असून खेळाडू मोठे विक्रम रचताना दिसत आहेत. त्यासोबतच मैदानातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. अशातच राजस्थान रॉयल्स संघाचा आक्रमक सलामीवीर जोस बटलर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याला एका चाहतीने  मैदानात आय लव्ह यू म्हटलं आहे.

जोस बटलर याला त्याची एक चाहती भेटते, जोसला भेटून ती खूप आनंदी असते. त्याच्यासोबत बोलण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. बटलरला ती ऑटोग्राफ मागते तेव्हा तोही लगेच दिला ऑटोग्राफ देतो त्यादरम्यान चाहती त्याला ‘आय लव्ह यू’ म्हणते. गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्याआधी तो नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करत असताना ती चाहती त्याला भेटायला आलेली असते. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड केला आहे. कॅप्शनमध्ये ‘आय लव्ह यू’, असं लिहिलं आहे.

 

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघामधील सामन्यात गुजरातन टायटन्स संघाच्या 178 धावांचा पाठलाग करताना रॉयल्सने 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला होता. गुजरातन टायटन्स संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसनने 60 धावा आणि हेटमायर याने नाबाद 56 धावांच्या जोरावर संघाने विजय मिळवला होता

या सामन्याध्ये जोस बटलर याला भोपळाही फोडता आला नव्हता. गुजरातचा बॉलर मोहम्मद शमीने जोस बटलर याला 0 वर बाद करत राजस्थानला दुसरा धक्का दिला होता. मात्र बाकी सामन्यांमध्ये बटलरने दमदार खेळी करत संघाला अनेकवेळा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उर्वरित सीझनमध्येही राजस्थानला बटलरकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.