IPL Media Rights : आयपीएल मीडिया हक्क पुन्हा डिज्नी स्टारकडे, 23 हजार 575 कोटी रूपयांना विक्री, जय शाह यांची माहिती

| Updated on: Jun 14, 2022 | 9:28 PM

आयपीएलचे मीडिया हक्क पाच वर्षांच्या कालावधीसाठी विकले गेले आहेत. 23 हजार 575 कोटी रुपयांना ही विक्री झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याची माहिती दिली आहे.

IPL Media Rights : आयपीएल मीडिया हक्क पुन्हा डिज्नी स्टारकडे, 23 हजार 575 कोटी रूपयांना विक्री, जय शाह यांची माहिती
IPL
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : आयपीएलचे मीडिया हक्क (IPL Media Rights) पाच वर्षांच्या कालावधीसाठी विकले गेले आहेत. 23 हजार 575 कोटी रुपयांना ही विक्री झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी याची माहिती दिली आहे. “STAR INDIA ने त्यांच्या 23 हजार 575 कोटींची बोली लावत अधिकार खरेदी केले आहेत. हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. कोरोनानंतर ही असी मोठी बेली लागत असल्याने मला आनंद होत आहे. हे सारं बीसीसीआयची (BCCI) संघटनात्मक क्षमता दाखवणारं आहे”, असं ट्विट जय शाह यांनी केलंय.

“आयपीएलचे मीडिया हक्क डिज्नी स्टारकडे”

“STAR INDIA ने त्यांच्या 23 हजार 575 कोटींची बोली लावत अधिकार खरेदी केले आहेत. हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. कोरोनानंतर ही असी मोठी बेली लागत असल्याने मला आनंद होत आहे. हे सारं बीसीसीआयची संघटनात्मक क्षमता दाखवणारं आहे”, असं ट्विट जय शाह यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

जय शाह यांचं ट्विट

स्थापनेपासून IPL हा वाढीचा समानार्थी शब्द आहे. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खास दिवस आहे. IPL ने ई-लिलावासह नवीन उच्चांक गाठला आहे. INR 48 हजार 390 कोटी मूल्य आहे. आयपीएल आता जगातील दुसरी सर्वात मूल्यवान क्रीडा लीग आहे, अशी माहिती जय शाह यांनी दिली आहे.

Viacom18 ने 23 हजार 758 कोटी रुपयांच्या बोलीसह डिजिटल अधिकार मिळवले आहेत. भारताची ही पहिली डिजिटल क्रांती म्हणता येईल. या क्षेत्राला मर्यादांची सीमा नाही. डिजिटल प्लॅटफ़र्म मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने क्रिकेट पाहण्याची पद्धत बदलली आहे. अनेकजण ऑनलाईन आयपीएलचा आनंद घेतात.