IPL Media Rights Auction : फक्त धावांचा नाही पैशांचाही पाऊस, 2 पॅकेजची 43 हजार कोटी बोली

12 जून रोजी मुंबईत होणाऱ्या लिलावात रिलायन्सचे वायाकॉम-18, झी, सोनी, स्टार-डिस्ने यांचा समावेश आहे. यापूर्वी अॅमेझॉनही मीडिया राईटच्या शर्यतीत होती, मात्र अॅमेझॉनने या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे.

IPL Media Rights Auction : फक्त धावांचा नाही पैशांचाही पाऊस, 2 पॅकेजची 43 हजार कोटी बोली
IPLImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:50 PM

मुंबई : IPL मध्ये (IPL) फक्त धावांचा, षटकार आणि चौकरांचाच पाऊस पडत नाही तर पैशांचाही पाऊस पडतो हे दाखवणार हा मीडिया राईट लिलव आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (BCCI) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या मीडिया राईटबाबत (IPL Media Rights) मुंबईत लिलाव सुरू आहे. हे लिलाव 2023 ते 2027 या वर्षाच्या सीझनसाठी होत असून बीसीसीआयला पैशांचा पाऊस या लिलावात अपेक्षित आहे. सध्या, आयपीएलचे मीडिया अधिकार डिस्ने-स्टारकडे आहेत, हा करार आयपीएल 2022 ला संपत आहे. यावेळी बीसीसीआयने आयपीएल मीडिया राईटची मूळ किंमत 32 हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवली आहे. ज्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक कंपन्या एकमेकांना आव्हान देत आहेत. 12 जून रोजी मुंबईत होणाऱ्या लिलावात रिलायन्सचे वायाकॉम-18, झी, सोनी, स्टार-डिस्ने यांचा समावेश आहे. यापूर्वी अॅमेझॉनही मीडिया राईटच्या शर्यतीत होती, मात्र अॅमेझॉनने या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे.

मेगाची किंमत 43 हजार कोटींच्या पुढे

आयपीएल मीडिया राईटचा लिलाव जोरात सुरू आहे. आतापर्यंत मेगाची किंमत 43 हजार कोटींच्या पुढे गेली असून ती 50 हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही आधीच्या मीडिया राईटच्या लिलावाच्या तिप्पट आहे. विशेष म्हणजे केवळ दोन पॅकेजसाठी 43 हजार कोटी रुपयांची बोली लागली आहे. यामध्ये टीव्ही अधिकार आणि डिजिटल अधिकार समाविष्ट आहेत, संपूर्ण मीडिया अधिकारांची रक्कम खूप जास्त असू शकते.

यावेळचा दर काय आहे?

अलिकडच्या काळात बरेच बदल झाले असून डिजिटलवर अधिक भर दिला जात आहे. यामुळेच आयपीएल 2023 ते आयपीएल 2027 पर्यंत मीडिया अधिकार चार पॅकेजमध्ये विभागले गेले आहेत.

  1. टीव्ही मीडिया अधिकार
  2. डिजिटल मीडिया अधिकार
  3. प्लेऑफ सामन्यांचे अधिकार
  4. भारताबाहेरील अधिकार

प्रतिमॅच किती कोटी?

येत्या तीन सीझनमध्ये दरवर्षी 74 सामने आणि दोन मोसमात 94 सामने आयोजित केले जावेत या आधारावर या पॅकेजची विभागणी करण्यात आली आहे. त्यानंतर बोली सुरू होईल. टीव्ही मीडिया राइट्सची प्रति सामन्याची मूळ किंमत 49 कोटी रुपये आहे, डिजिटल मीडिया राइट्सची प्रति सामन्याची मूळ किंमत 33 कोटी रुपये आहे, पॅकेज सी ची किंमत प्रति सामना 11 कोटी रुपये आहे आणि पॅकेज डी ची किंमत 3 कोटी रुपये आहे.

किती कोटींपर्यंत जाऊ शकतो लिलाव?

बीसीसीआयने मीडिया राईटची मूळ किंमत 32,000 कोटी रुपये ठेवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आयपीएल 2022 मध्ये टीव्ही रेटिंग खूप कमी होते, पण त्यानंतरही आयपीएलमध्ये काही फरक पडला नाही. बेसिक किमतीनुसार लिलावात बोली 60 हजार कोटींपर्यंत जाऊ शकते, असे मानले जात होते. कारण यापूर्वी अॅमेझॉन आणि रिलायन्ससारख्या बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होण्याची अपेक्षा होती. मात्र, अॅमेझॉनने आपले नाव मागे घेतल्याने ही आशा धुळीस मिळाली आहे. यानंतरही लिलाव 50 हजार कोटींवर गेला तर नवल वाटणार नाही. विशेष म्हणजे यावेळी टीव्हीचे हक्क आणि डिजिटल हक्कही वेगवेगळ्या कंपन्यांकडून खरेदी करता येणार आहेत.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.