IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपचा मानकरी कोण? मुंबई राजस्थान सामन्यानंतर वाचा काय झालं?

| Updated on: Apr 22, 2024 | 11:48 PM

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer ranking : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल सामन्यानंतरही ऑरेंज कॅपचा मान विराट कोहलीकडे आहे. मात्र गेल्या काही सामन्यात असलेलं अंतर आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. येत्या दोन ते तीन सामन्यात ही कॅप हिरावून घेतली जाऊ शकते.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपचा मानकरी कोण? मुंबई राजस्थान सामन्यानंतर वाचा काय झालं?
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील ऑरेंज कॅपची शर्यत चुरशीची होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र आता त्या स्थानाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून असलेलं धावांमधील अंतर गेल्या काही सामन्यात कमी होताना दिसत आहे. विराट कोहली दोन सामन्यात फेल गेल्यानंतर त्याचा फायदा इतर फलंदाजांना होताना दिसत आहे. विराट कोहली 8 सामन्यात 379 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड 324 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा रियान पराग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 318 धावा आहेत. रोहित शर्मा चौथ्या स्थानी असून त्याच्या नावावर 303 धावा आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पाचव्या स्थानी असून त्याच्या नावावर एकूण 299 धावा आहेत.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 38वा सामना पार पडला. अजून साखळी फेरीतील 32 सामने उरले आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आणखी चुरस पाहायला मिळणार आहे. विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप असली तरी संघाची स्थिती एकदम वाईट आहे. खरं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या डोक्यावरील कॅप कायम राहाणं तसं कठीण आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

आयपीएल स्पर्धेतील 38वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा केल्या आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 1 गडी गमवून पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालने नाबाद 104 धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.