
हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील आपल्या पहिल्या 2 सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर मुंबई इंडियन्स टीमने जोरदार मुसंडी मारत दणक्यात कमबॅक केलं आहे. मंगळवारी 18 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. मुंबईने या सामन्यात हैदराबादला 193 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईने हैदराबादला 178 धावांवर ऑलआऊट करत 14 धावांनी विजय मिळवला. मुंबईने या विजयासह सलग 3 सामने जिंकण्याची कामगिरी केली. मुंबईला या विजयाचा पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.
या सामन्याआधी मुंबई आणि हैदराबाद दोन्हा संघांची स्थिती सारखीच होती. त्यामुळे पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई आणि हैदराबाद आठव्या आणि नवव्या स्थानी होती. पण विजयानंतर पॉइंट्सटेबलमध्ये बदल झाला. मुंबईला 2 स्थानांचा फायदा झाला. आठव्या स्थानावर असलेल्या मुंबईने केकेआर आणि आरसीबीला पछाडत सहाव्या स्थानावर झेप घेतली. मुंबईचे आता 5 सामन्यांमध्ये 3 विजयासह 6 पॉइंट्स आहेत.
तर मुंबईच्या विजयामुळे सहाव्या स्थानावर असेल्या केकेआर आणि सातव्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला नुकसान झालं आहे. केकेआर आणि आरसीबी सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तर हैदराबाद नवव्या स्थानी कायम आहे. तर दिल्ली 5 ही सामन्यात विजयाचं खातं उघडता न आल्याने तळाशी आहे.
आयपीएल पॉइंट्स टेबल 2023
| संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
|---|---|---|---|---|---|
| गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
| चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
| लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
| मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
| राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
| आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
| केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
| पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
| दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
| सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला. मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये कॅमरुन ग्रीन याच्या 64, इशान किशन 38, टिळक वर्मा 37, रोहित शर्मा 28 आणि टीम डेव्हिड याने केलेल्या 16 धावांच्या जोरावर 5 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. हैदराबादने 193 धावांचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात झाली.
मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला ठराविक अंतराने धक्के देणं सुरुच ठेवलं. त्यामुळे कोणतीही भागादारी अपेक्षेप्रमाणे मोठी होऊ शकली नाही. हैदराबादकडून मयंक अग्रवाल याने 48 आणि हेनरीच क्लासेन याने 36 धावा केल्या. तर कॅप्टन एडन मार्करमने 22 रन्सचं योगदान दिलं. पण इतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख पार न पाडल्याने पराभव स्वीकारावा लागला. तसेच मुंबईच्या गोलंदाजांनीही हैदराबादला कुठेही वरचढ होऊ दिलं नाही.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.