
आयपीलच्या 17 व्या मोसमातील 49 वा सामना बुधवारी 1 मे रोजी पार पडला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात आमनसामने होते. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईचं होम ग्राउंड अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. पाहुण्या पंजाबने या सामन्यात बाजी मारली. पंजाबने यजमान चेन्नईचा 7 विकेट्सने विजय मिळवला. पंजाबने या विजयासह प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. चेन्नईने पंजाबला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होंत. पंजाबने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 13 बॉल राखून मिळवलं. पंजाबच्या या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? हे जाणून घेऊयात.
पंजाबच्या विजयामुळे गुजरात टायटन्सला फटका बसला आहे. पंजाबला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तर गुजरातची एका स्थानाने घसरण झाली आहे. पंजाबने या विजयासह सातव्या स्थानी झेप घेतली आहे. पंजाबचा नेट रनरेट हा -0.062 असा आहे जो सामन्याआधी -0.187 असा होता. तर गुजरात आठव्या स्थानी फेकली गेली आहे. पंजाब आणि गुजरात दोन्ही संघांनी 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मात्र गुजरातच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने पंजाब सातव्या स्थानी आहे.
चेन्नई पराभवानंतरही चौथ्या स्थानी कायम आहे. मात्र चेन्नईला या पराभवाचा जबरदस्त फटका बसला आहे. चेन्नईने 10 पैकी 5 सामने जिंकलेत तर 5 गमावलेत. आता चेन्नईला प्लेऑफपर्यंत पोहचणं जरा अवघड झालं आहे. चेन्नईला आता इथून पुढे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
Our position in the points table! 😌
Thala for a reason! 👀 pic.twitter.com/nKWjZFm10u
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 1, 2024
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन आणि मुस्तफिजुर रहमान.