बॉक्सिंग डे कसोटी प्रत्येक वर्षी 26 डिसेंबरला सुरु होण्याचं कारण काय? जाणून घ्या सर्वकाही
एशेज कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना 26 डिसेंबरला होणार असल्याने या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी म्हणून संबोधलं जात आहे. पण असं का? त्या मागचं कारण काय? समजून घ्या.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेला एशेज कसोटी मालिका संबोधलं जातं हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणजे काय? हे अनेकांना माहिती नाही. ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी 26 डिसेंबरला खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी सामना संबोधलं जातं. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी हा सामना होत असल्याने त्याचं महत्त्व आहे. कारण ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 26 डिसेंबरपासून हा सामना सुरु होतो. पण या नावाची परंपरा आणि त्याचं कारण सर्वांनाच माहिती आहे असं नाही. ख्रिसमस दरम्यान ऑस्ट्रेलियातील लोकं मोठ्या सुट्टीवर असतात. यात पंरपरेनुसार एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला हा सामना असतो म्हणून त्याला बॉक्सिंग डे म्हणून ओळख मिळाली आहे.
1892 मध्ये बॉक्सिंग डे हे नाव पडलं
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ 1892 मध्ये देशांतर्गत मालिका खेळत होते. तेव्हा ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सामने खेळले गेले. तेव्हा बॉक्सिंग डे शब्दाची एन्ट्री झाली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1950 मध्ये बॉक्सिंग डे हा शब्दप्रयोग केला गेला. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या कोसटी सामना खेळला गेला. तर 1974-75 मध्ये खेळल्या गेलेल्या एशेज कसोटी मालिकेत बॉक्सिंग डे कसोटी खेळण्याची प्रथा पडली. हा सामना मेलबर्नच्या क्रिकेट मैदानात खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत 26 डिसेंबरला होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी असं संबोधलं जातं. तसेच हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानातच होते. कारण या मैदानात प्रेक्षकांना बसण्याची क्षमता अधिक आहे. जवळपास 1 लाख लोकं एकाचवेळी सामन्याचा आनंद लुटू शकतात.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत या मैदानात 117 सामने खेळले गेले असून त्यात 68 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 32 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. 2000 सालापासून या दिवशी खेळलेल्या सामन्यांची संख्या 25 असून त्यापैकी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चार सामन्यात पराभव आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 14 बॉक्सिंग डे सामने झाले आहेत. यात भारताने 4 सामन्यात विजय, 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत.
