IPL 2026 Points Table: चेन्नईचा सलग दुसरा विजय, केकेआरची आणखी वाईट स्थिती, मुंबईला मोठा झटका
IPL 2026 Points Table: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 2 चॅम्पियन्स संघातील सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. चेन्नईच्या विजयामुळे मुंबईला फटका बसला आहे.

चेन्नई सुपर किंग्सची ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आणि महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत आयपीएल 2026 स्पर्धेत निराशाजनक सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेत एकूण 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नईला पहिल्या आणि सलग 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर चेन्नईने दणक्यात कमबॅक करुन दाखवलं आहे. चेन्नईने दिल्ली कॅपिट्ल्सनंतर आता कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय साकारला आहे. ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीत यलो आर्मीने मंगळवारी 14 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं. चेन्नईचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तर केकेआरला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईच्या सलग दुसऱ्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमधील लोअर ऑर्डरमध्ये बदल झाला आहे. चेन्नईने एका स्थानाने झेप घेतली आहे. केकेआरची आणखी वाईट स्थिती झाली आहे. तर मुंबईची घसरण झाली आहे. पॉइंट्स टेबलची स्थिती काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.
चेन्नईला विजयानंतर फायदा
चेन्नई केकेआर विरूद्धच्या विजयानंतर नवव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर पोहचली आहे. तसेच चेन्नईच्या नेट रनरेटमध्ये बदल झाला आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा सामन्याआधी -1.532 असा होता. चेन्नईचा विजयानंतर नेट रनरेट -0.846 असा झाला आहे. चेन्नईच्या खात्यात आता 5 सामन्यानंतर 2 विजयासह 4 गुण झाले आहेत. मात्र चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीत कायम रहायचं असेल तर इथून असंच सातत्य ठेवावं लागेल. तर चेन्नई आठव्या स्थानी गेल्याने मुंबईला झटका लागला आहे. मुंबईची आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
केकेआरचा फ्लॉप शो कायम, पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी
केकेआरने पाचव्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी कायम ठेवली. केकेआरची यासह स्पर्धेच्या इतिहासात पाचव्या सामन्यानंतरही विजयी न होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. केकेआरला 5 पैकी 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर केकेआरचा पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे केकेआरच्या खात्यात 1 गुण आहे. केकेआरचा नेट रनरेट हा -1.383 असा झाला आहे.
चेन्नईची सलग दुसऱ्या विजयासह आठव्या स्थानी उडी
CHENNAI SUPER KINGS MOVED TO NUMBER 8 IN IPL 2026 POINTS TABLE 🔥😍 pic.twitter.com/X5rkkS1htV
— Johns. (@CricCrazyJohns) April 14, 2026
इतर संघांची स्थिती काय?
राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानी विराजमान आहे. राजस्थानने 5 पैकी 4 सामने जिंकलेत. राजस्थानच्या खात्यात 8 गुण आहेत. पंजाब 7 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबी 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी असलेल्या हैदराबादने 5 पैकी 2 सामने जिंकलेत. तर दिल्ली, गुजरात आणि लखनौने प्रत्येकी 2-2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.