IPL Retention 2022 : कोहली, धोनी, रोहित ते ऋतुराज…. रिटेंशनसाठी या खेळाडूंची नावं कन्फर्म, राहुल-वॉर्नर लिलावात उतरणार

| Updated on: Nov 30, 2021 | 4:14 PM

IPL च्या 15 व्या हंगामाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लवकरच त्यासाठी खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडणार आहे. दरम्यान, सध्याच्या 8 फ्रेंचायझींना संघात कायम ठेवणार असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे.

IPL Retention 2022 : कोहली, धोनी, रोहित ते ऋतुराज.... रिटेंशनसाठी या खेळाडूंची नावं कन्फर्म, राहुल-वॉर्नर लिलावात उतरणार
IPL Teams captain
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लवकरच त्यासाठी खेळाडूंचा मोठा लिलाव पार पडणार आहे. तसेच या मोसमात दोन नवी संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, सध्याच्या 8 फ्रेंचायझींना संघात कायम ठेवणार असलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत आज (मंगळवार) संपत आहे. (IPL Retention list almost ready Dhoni, Kohli, Rohit and Ruturaj retained by franchises)

जुन्या आठ संघातील कायम ठेवलेल्या खेळाडूंना अंतिम रूप दिल्यानंतर, लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझींना 1 ते 25 डिसेंबर दरम्यान 3 खेळाडू निवडण्याची संधी मिळेल, त्यानंतर जानेवारीमध्ये लिलाव होणार आहे. 8 संघ जास्तीत जास्त 4 खेळाडू संघात कायम ठेवू शकतात, ज्यामध्ये 3 पेक्षा जास्त भारतीय आणि 2 पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आठ जुन्या संघांनी त्यांची रिटेन्शन यादी जवळजवळ अंतिम केली आहे.

किती खेळाडू रिटेन केल्यानंतर किती पैसे वाचणार?

सर्व फ्रेंचायझी संघांकडे 90 कोटी रुपयांची पर्स असेल. फ्रेंचायझी संघाने चार खेळाडूंना कायम ठेवल्यास त्यांच्या पर्समधील 42 कोटी रुपये कापले जातील. तीन खेळाडूंना कायम ठेवल्यास 33 कोटी रुपये पर्समधून कमी होतील. दोन खेळाडूंना कायम ठेवल्यास 24 कोटी रुपये पर्समधून कापले जातील आणी एक खेळाडू कायम ठेवल्यास 14 कोटी रुपये पर्समधून कमी होतील.

दोन नवीन फ्रेंचायझी संघांसाठी काय नियम असतील

लखनौ आणि अहमदाबादचे संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मेगा ऑक्शनपूर्वी, या दोन फ्रेंचायझी संघांना लिलावात येणारे पहिले तीन खेळाडू निवडण्याचा पर्याय असेल. या यादीत दोनपेक्षा जास्त भारतीय खेळाडू घेता येणार नाहीत. तसेच केवळ एकच परदेश खेळाडू या पद्धतीने संघात घेता येईल.

CSK, MI, DC, RCB, KKR आणि RR ने संघात कायम ठेवलेले खेळाडू

चेन्नई सुरपकिंग्स : एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली

चेन्नईचा संघ धोनी आणि जाडेजाला रिटेन करणार हे खूप आधीच ठरलं होतं. त्यासोबतच संघाला यंदाच्या मोसमात विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या ऋतुराज गायकवाडलादेखील सीएसके रिटेन करणार आहे. तसेच सध्या टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या मोईन अलीला सीएसके रिटेन करणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि एनरिक नोर्किया.

दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला आपल्यासोबत कायम ठेवले आहे. त्याच्याशिवाय पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्किया या तिघांना फ्रेचायझी कायम ठेवेल. दुसरीकडे दिल्लीने रवीचंद्रन अश्विन आणि कगिसो रबाडा या खेळाडूंना वगळावे लागले आहे. इतर संघ त्यांना लिलावात विकत घेण्यासाठी मोठी बोली लावू शकतात.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, (कायरन पोलार्ड, इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव)

5 वेळा चॅम्पियन बनलेली मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी आपला कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना संघात कायम ठेवणार आहे. दरम्यान, मुंबईचे संघमालक सूर्यकुमार यादव आणि अनुभवी कायरन पोलार्ड या दोघांना संघात कायम ठेवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र अहवालांनुसार अद्यापपर्यंत दोघांनाही कायम ठेवण्याचा निर्णय झालेला नाही.

मात्र, संघासमोर सूर्यकुमार आणि इशान किशन यापैकी एकाचीच निवड करण्याचा पर्याय आहे. हार्दिक पंड्या पूर्वीसारखा अष्टपैलू खेळाडू राहिलेला नाही. गोलंदाजी करू न शकल्याने तो सतत चर्चेत असतो. मात्र संघ त्याला पुन्हा लिलावात खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नारायण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर

केकेआर फ्रेंचायझीने वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांना त्यांच्यासोबत कायम ठेवणार आहे. म्हणजेच इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ऑईन मॉर्गन आणि शुभमन गिल यांना लिलावात उतरावे लागणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल

विराट कोहलीने कर्णधारपद सोडले असले तरी आरसीबीने या स्टार खेळाडूला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच फ्रेंचायझीने ग्लेन मॅक्सवेलचे नावही फायनल केले आहे. फ्रेंजायची हर्षल पटेलला रिटेन करण्याचा विचार करत आहे.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी रुपये)

राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सॅमसनला कर्णधार बनवूनही संघाचे नशीब बदलले नाही. यशस्वी जयस्वालही कायम ठेवण्याच्या शर्यतीत आहे. इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला ते रिटेन करु शकतात.

सनरायझर्स हैदराबाद : केन विलियम्सन

सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझीने किवी कर्णधार केन विल्यमसनला संघात कायम ठेवले आहे. त्याचबरोबर राशिद खानच्या नावावरही संघ विचार करत आहे. भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांच्यापैकी एका खेळाडूला ते रिटेन करु शकतात.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्स फ्रेंचायझी कोणत्याही खेळाडूला रिटेन करणार नाही. पंजाब किंग्जच्या कर्णधार केएल राहुलचा लिलावात समावेश होणं जवळपास निश्चित आहे. आता या फ्रेंचायझीसमोर नवीन सुरुवात करण्याचे आव्हान आहे. संघ रवी बिश्नोई आणि अर्शदीप सारख्या अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंपैकी मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि निकोलस पूरन यांना आपल्या निवडीसाठी संघर्ष करावा लागणार आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Retention Live Stream: आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं रिटेंशन कधी, कुठे आणि कसं पाहणार?

आफ्रिकन देशांसाठी भारताचं मोठं पाऊल, केविन पीटरसनही भारावला, भारतीयांचं कौतुक करत नरेंद्र मोदींचे मानले आभार

Ipl : आयपीएलमध्ये 10 टीम खेळवण्याचा स्पप्नभंग होणार? अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन?

(IPL Retention list almost ready Dhoni, Kohli, Rohit and Ruturaj retained by franchises)