
डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20 सामना हा अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका ही 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला आयर्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र ती संधी पावसाने हिसकावून घेतली.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झालाय. तिसऱ्या सामन्यातील टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार होता. तर त्यानंतर अर्ध्या तासाने 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे इथे टॉसचीच बोंब झाली.
पंचांनी पाऊस सुरु असल्याने पीचची अनेकदा पाहणी केली. पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी खेळण्याच्या पात्रतेची आहे का, हे अंपायर्संकडून पाहिलं जात होतं. आयर्लंड क्रिकेटने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी पाहणी करण्यात येणार असल्याचं ट्विटद्वारे सांगण्यात आलं. त्यानुसार पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं.
तिसरा टी 20 सामना पावसामुळे वाया
The rain wins this time ☔
The final T20I of against India has been abandoned. Thanks to them for a great series 🤝#IREvIND ☘️🏏 #BackingGreen #koremobile pic.twitter.com/OIVIsZqPSd
— Cricket Ireland (@cricketireland) August 23, 2023
टीम इंडियाने या मालिका विजयासह एक अनोखा विक्रम केला आहे. टीम इंडियाने सलग दहाव्यांदा 3 सामन्यांची मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.