IRELAND vs INDIA 3rd T20I | पावसामुळे तब्बल अडीच तास उशीर, सामना रद्द होणार?
ireland vs india 3rd t20i rain updates | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्याआधीच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अजून टॉसही होऊ शकलेला नाही.

डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या सामन्याला नियोजित वेळापत्रकानुसार आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार होता. तर 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणार होता. मात्र आता अडीच तास होऊन गेलेत. इतक्यात पहिल्या डावातील खेळ संपून दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असती. मात्र अजून सामना सुरु झाला नाही. कारण पाऊस. डब्लिन इथे मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. त्यामुळे आतापर्यंत टॉसही होऊ शकलेला नाही. त्यामुळे सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा चांगलाच संताप झालेला आहे.
हवामानाचा अंदाज काय?
तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान पाऊस होणार असल्याचा अंदाज एका वेबसाईटने वर्तवला होता. त्या अंदाजानुसार डब्लिनमध्ये पाऊस होतोय. आता हा पाऊस थांबतो की सामन्याला धुवून काढतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
सामना होणार की नाही?
दरम्यान 10 वाजून गेल्यानंतरही टॉस झाला नाहीये. त्यामुळे आता सामना होणार की नाही, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. पंचांकडून सातत्याने खेळपट्टीची पाहणी केली जातेय. आयर्लंड क्रिकेटने ट्विटद्वारे 9 वाजून 25 मिनिटांनी पुढील पाहणी ही आयर्लंडमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी पुन्हा पाहणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाहणीनंतर काय माहिती समोर येते, यावर सर्वकाही अवलंबून आहे.
आयर्लंड क्रिकेटची महत्वाची माहिती
Inspection done… and we’ll have another inspection at 5.45pm 🤞
— Cricket Ireland (@cricketireland) August 23, 2023
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.
