IRE vs PAK 2nd T20I : पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’, आयर्लंडला मालिका विजयाची संधी

| Updated on: May 12, 2024 | 4:59 PM

Ireland vs Pakistan 2nd T20I : एका बाजूला आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी आयर्लंड विरुद्ध करो या मरो असा सामना असणार आहे.

IRE vs PAK 2nd T20I : पाकिस्तानसाठी करो या मरो, आयर्लंडला मालिका विजयाची संधी
babar azam and paul streling
Follow us on

आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा आणि निर्णायक टी 20 सामना हा आज 12 मे रोजी होणार आहे. सामन्याचं आयोजन हे क्रिकेट क्लब ग्राउंड क्लोनटार्फ येथे होणार आहे. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पाकिस्तनाच्या नेतृत्वाची जबाबदारी बाबर आझम याच्याकडे आहे. तर पॉल स्टर्लिंग आयर्लंडकडे आहे. आयर्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आयर्लंडला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

आयर्लंडने पाकिस्तानवर पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला होता. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 183 धावांचं आव्हान हे आयर्लंडने 5 विकेट्स गमावून 19.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. अँड्रयू बालबर्नी हा आयर्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. अँड्रयूने आयर्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या. अँड्रयूने 55 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. अँड्रयूच्या या खेळीने आयर्लंडच्या विजयाचा पाया रचला होता.

आता आयर्लंड टीमला आणि क्रिकेट चाहत्यांना दुसऱ्या सामन्यात अँड्रयूकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे. आयर्लंडला या विजयासह मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे आयर्लंडचा पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच टी 20 मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

आयर्लंड मालिका विजयासाठी सज्ज

आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), लॉर्कन टकर (विकेटकीपर), अँड्र्यू बालबर्नी, हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, कर्टिस कॅम्फर, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस ॲडायर.

पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), आझम खान (विकेटकीपर), सैम अयुब, मोहम्मद रिझवान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, इमाद वसीम, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान, मोहम्मद अमीर, हसन अली, हरिस रौफ, आगा सलमान, अबरार अहमद आणि इरफान खान.