IPL 2022 Auction: सुरेश रैनाला CSK ने का खरेदी केलं नाही? स्वतः CEO ने केला खुलासा

| Updated on: Feb 15, 2022 | 9:49 AM

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला टाटा आयपीएलच्या (IPL) महा लिलावात (Mega Auction 2022) मध्ये कोणीही खरेदीदार मिळणार नाही. ऑक्शनसाठी 600 खेळाडूंमध्ये सुरेश रैनाचीही (Suresh Raina) निवड झाली होती. शनिवारी (लिलावाच्या पहिल्या दिवशी) जेव्हा त्याच्या नावाचा पुकार करण्यात आला, त्यावेळी कुठल्याही फ्रेंचायजीने त्याच्यासाठी बोली लावली नाही.

IPL 2022 Auction: सुरेश रैनाला CSK ने का खरेदी केलं नाही? स्वतः CEO ने केला खुलासा
Suresh Raina (File Pic)
Follow us on

बंगळुरु : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला टाटा आयपीएलच्या (IPL) महा लिलावात (Mega Auction 2022) मध्ये कोणीही खरेदीदार मिळणार नाही. ऑक्शनसाठी 600 खेळाडूंमध्ये सुरेश रैनाचीही (Suresh Raina) निवड झाली होती. शनिवारी (लिलावाच्या पहिल्या दिवशी) जेव्हा त्याच्या नावाचा पुकार करण्यात आला, त्यावेळी कुठल्याही फ्रेंचायजीने त्याच्यासाठी बोली लावली नाही. मागची काही वर्ष सुरेश रैना सातत्याने CSK साठी खेळतोय. आक्रमक डावखुरा फलंदाज अशी सुरेश रैनाची ओळख आहे. वेगाने धाव करण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. भारताकडूनही तो अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. रैना हा आयपीएलमधला सर्वात मोठा स्टार खेळाडू आहे. त्यामुळेच त्याला मिस्टर आयपीएल या नावाने ओळखलं जातं. मात्र यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच UNSOLD ठरला आहे. गेल्या वर्षी व्यक्तीगत कारणांमुळे तो UAE मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता.

CSK चे CEO काशी विश्वनाथ यांनी फ्रँचायझीने सुरेश रैनाला का विकत घेतले नाही याबाबत खुलासा केला आहे. रैना हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने या लीगमध्ये 205 सामने खेळले असून 5528 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने केलेल्या धावांपैकी 4678 धावा त्याने चेन्नईकडून खेळताना केल्या आहेत. तो चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते.

फॉर्म आणि संघरचनेवर लक्ष केंद्रित

विश्वनाथ म्हणाले, रैनाने सीएसकेसाठी सातत्याने दमदार खेळ केला आहे, परंतु लिलावात खेळाडूंची निवड करताना संघ रचना आणि फॉर्म लक्षात घेण्यात आला होता. CSK ने आपल्या YouTube चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये विश्वनाथ म्हणाले, “रैना गेल्या 12 वर्षांपासून CSK साठी चांगली कामगिरी करत आहे. साहजिकच, रैनाला न घेणं हे आमच्यासाठी अवघड होतं, परंतु त्याच वेळी तुम्हाला संघरचना आणि खेळाडूंचा फॉर्म लक्षात घ्यावा लागेल. तसेच आयपीएलमध्ये कशा प्रकारची टीम उतरवली पाहिजे, हेदेखील समजून घ्यावे लागेल. या गोष्टी लक्षात घेऊन तो संघात बसत नाही, असे आम्हाला वाटले.”

सुरेश रैना आयपीएलमधल्या लिजिंडपैकी एक आहे. त्याने आयपीएलच्या 204 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये केवळ विराट कोहली (6283), शिखर धवन (5784) आणि रोहित शर्मा यांच्या (5611) त्याच्या पुढे आहेत.

इतर बातम्या

IPL 2022 : IPL मध्ये त्याला कोणी विचारलं नाही, अखेर ‘त्या’ सौंदर्यवतीने समोर येऊन दिलं उत्तर, कोण आहे ‘ती’

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर

IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?