
आयसीसी स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना व्हावा यासाठी हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ अनकेदा एकाच गटात असतात. त्यामुळे स्पर्धेपूर्वीच या सामन्याची अशीच जाहीरात होते. पण आता 2028 लॉस अँजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणं कठीण आहे. कारण या स्पर्धेत फक्त सहा संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला या स्पर्धेत जागा मिळणं कठीण आहे. आयसीसीने 7 नोव्हेंबर झालेल्या बैठकीत 2028 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सहा संघ कसे पात्र ठरतील याबाबतच्या मसुद्याची चर्चा केली. या मसुद्यानुसार, आशियातून भारत, अफ्रिकेतून दक्षिण अफ्रिका, युरोपमधून इंग्लंड, ओशनियामधून ऑस्ट्रेलिया पात्र ठरेल. तर यजमान म्हणून अमेरिकेलाही प्रवेश मिळू शकते. अमेरिकेने या स्पर्धेत भाग घेतला नाही तर वेस्ट इंडिजला सधी मिळू शकते. त्यामुळे या स्पर्धेसाठी सहा पैकी पाच संघ ठरले आहेत. पण सहाव्या संघासाठी जोरदार रस्सीखेंच आहे. ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नाही.
ऑलिम्पिक 2028 स्पर्धेत पाकिस्तानला भाग घ्यायचा असेल तर अत्यंत कठीण स्पर्धेतून जावं लागणार आहे. पाकिस्तानला न्यूझीलंड, श्रीलंका, अफगाणिस्तान या सारख्या संघांविरुद्ध विजय मिळवावा लागेल. तरीही त्यांना भारताच्या गटात स्थान मिळेल की नाही सांगता येत नाही. कारण पाकिस्तानचा सध्याचा फॉर्म पाहता ही स्पर्धा खूपच कठीण जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत जवळपास 128 वर्षानंतर क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी जोरदार तयारी करत आहे.
🚨 CRICKET QUALIFICATION IN OLYMPICS 🚨 [Sahil Malhotra from TOI]
👉 Based on ranking from each continent.
IND from Asia
AUS from Oceania
ENG from Europe
SA from Africa
It will be interesting to see whether they will pick USA, as host or West Indies region with qualification… pic.twitter.com/HF1j781FoM— Johns. (@CricCrazyJohns) November 8, 2025
ऑलिम्पिक स्पर्धेत महिला आणि पुरूष दोन्ही संघ भाग घेणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेचा फॉर्मेट हा टी20 असणार आहे. ही स्पर्धा 12 जुलै ते 29 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे. महिलांचा अंतिम सामना 20 जुलैला आणि पुरूषांचा सामना 29 जुलैला होणार आहे. दोन्ही कॅटेगरीत एकूण 28 सामने खेळले जाणार आहे. सर्व सामना पोमोनाच्या फेअरग्राउंड्सवर खेळले जातील. दरम्यान, वर्ष 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पदकासाठी सामना झाला होता. तेव्हा ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघांनी क्वॉलिफाय केलं होतं. तेव्हा ग्रेट ब्रिटेनने सुवर्ण पदक पटाकवलं होतं. तर फ्रान्सला रजत पदक मिळालं होतं.