
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 17व्या सामन्यात नेपाळ आणि इटली हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इटलीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण संपूर्ण सामन्यावर इटलीची पकड दिली. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्व गडी गमवून 123 धावा केल्या. तसेच विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इटलने 12.4 षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं. या सामन्यात जस्टीन मोक्सा आणि अँथोनी मोक्सा यांनी विजयी भागीदारी केली. जस्टीन मोक्साने 44 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 60 धावांची खेळी केली. तर अँथोनी मोक्साने 32 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 62 धावा केल्या. या विजयासह इटलीने या स्पर्धेत विक्रमाची नोंद केली आहे.
जस्टिन मोस्का आणि अँथनी मोस्का यांची नाबाद 124 धावांची भागीदारी ही टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भावंडांमधील मोठी भागीदारी आहे. यापूर्वी 2014 टी20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कामरान अकमल आणि उमर अकमल यांच्या 96 धावांच्या भागीदारी केली होती.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 120 हून अधिक धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू राखून विजय मिळवण्याऱ्या संघाच्या यादीत इटली तिसऱ्या स्थानावर आहे. इटलीने 44 चेंडू राखून नेपाळला पराभूत केले. यापूर्वी वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत अमेरिकेला 129 धावांचा पाठलाग करताना 55 चेंडू राखले होते. तर 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्देत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 50 चेंडू राखून पराभूत केलं होतं.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळचा हा दुसरा 10 विकेटने पराभव आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजने 2025 मध्ये 10 विकेट राखून पराभूत केलं होतं. तर इटलीचा हा पहिला 10 विकेटने विजय झाला आहे. असोसिएट संघापैकी टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हा दुसरा 10 विकेटने विजय आहे. यापूर्वी 2021 मध्ये ओमानने पीएनजीला 10 विकेटने पराभूत केलं होतं.
असोसिएट संघांच्या विक्रमाच्या यादीत इटलीच्या या जोडीने तिसऱ्या क्रमांकाची विक्रमी भागीदारी केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओमानच्या अकिब लियास आणि जतिंदर सिंगने 2021 मध्ये ओमानविरूद्ध नाबाद 131 धावा केल्या होत्या. तर मायकल जोन्स आणि जॉर्ज मुन्से यांनी स्कॉटलँडसाठी इटलीविरूद्ध याच स्पर्धेत 126 धावांची भागादारी केली होती.