आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची वेळ! युवराज सिंगने थेट सांगितलं; संघही स्पर्धेतून झाला आऊट

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहा पैकी चार संघांची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. तर सहा संघांना घरचं तिकीट मिळालं आहे, असं असताना युवराज सिंगने शेअर केलेल्या एका फोटोवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यात त्याने तीन खेळाडूंना चपलेने मारण्याचं भाष्य केलं आहे.

आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची वेळ! युवराज सिंगने थेट सांगितलं; संघही स्पर्धेतून झाला आऊट
आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची वेळ! युवराज सिंगने थेट सांगितलं; संघही स्पर्धेतून झाला आऊट
Image Credit source: Yuvraj Singh Twitter
| Updated on: May 25, 2026 | 4:04 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांची निवड झाली आहे. असं असताना युवराज सिंगचं कमेंट चर्चेत आली आहे. त्याने आयपीएलमधील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची धमकी देत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. युवराज सिंगने सोशल मीडियावर उघडपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. युवराज सिंगने पंजाब किंग्सच्या तीन खेळाडूंना धारेवर धरलं आहे. पंजाब किंग्स संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. असं असताना पंजाब किंग्सने तीन खेळाडू त्याच्या रडारवर आले आहे. त्यासाठी सोशल मीडियावरील फोटो निमित्त ठरला आहे. यात युवराज सिंगचा एक शिष्य आहे. तर दोन खेळाडू पंजाब किंग्स संघातील आहे. प्रियांश आर्य, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार या तीन खेळाडूवर युवराज सिंगने संताप व्यक्त करत चपलेने मारण्याची वेळ आल्याचं सांगितलं आहे.

पंजाब किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला जबरदस्त कामगिरी केली होती. सुरूवातीच्या सहा सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सलग सहा पराभवाने प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचं स्वप्न भंगलं आणि स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. असं असताना हरप्रीत ब्रारने प्रियांश आर्या आणि अर्शदीप सिंगसोबत एक फोटो शेअर केला आहे. हरप्रीतीने प्रियांशचा उल्लेख स्लॉगर, तर अर्शदीपचा उल्लेख ब्लॉगर असा केला आहे. या फोटोखाली युवराज सिंगने प्रतिक्रिया नोंदवली आहे. “आता तुम्हा सर्वांना तुमच्या चपलांनी मारण्याची वेळ आली आहे,” असं लिहिलं आहे.

पंजाब किंग्सकडून खेळताना प्रियांश आर्यची कामगिरी त्यातल्या त्यात समाधानकारक राहिली. त्याने आयपीएलच्या 13 सामन्यात 211पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने 364 धावा केल्या. अर्शदीप सिंगसाठी हे पर्व निराशाजनक गेलं. त्याने 14 सामन्यात 38.64 च्या सरासरीने आणि 10.20 च्या इकोनॉमी रेटने 541 धावा देत 14 विकेट घेतल्या. तर हरप्रीत ब्रारला फक्त दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या.

Follow Us