AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, फडणवीसांची सभागृहात कर्जमाफीसंदर्भात सर्वात मोठी घोषणा, काय आहेत नवे निकष?

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सर्वात मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, फडणवीसांची सभागृहात कर्जमाफीसंदर्भात सर्वात मोठी घोषणा, काय आहेत नवे निकष?
Farm Loan Waiver SchemeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 6:27 PM
Share

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटाचा दिवस आहे, सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.  महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते, त्यांना आपण 50 हजारांपर्यंत कर्जमाफी देऊ म्हटलं होतं, यामागे त्यांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तीन वर्षांपैकी दोन वर्ष ज्यांनी पैसे भरले आहेत, ते सर्व शेतकरी आता या योजनेसाठी पात्र होतील, पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.  हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता म्हणून करतोय,  त्याने शेतकरी श्रीमंत होत नाही. त्याला सावकाराकडे जावू लागू नये म्हणून कर्जमाफी करत आहे.  विधानसभा निवडणूकपूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते,  शेतकरी अडचणीत असल्याने निर्णय घेतला. निवडणूक सगळ्या जिंकलो होतो, तरी कर्जमाफी केली.  कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार 25 हजार कोटी रुपये दरवर्षी वीजबिल माफीसाठी देते. हे पैसे आपण भरतो कृषी विभागाच्या योजना व सबसिडीवर 95 हजार कोटी रुपये खर्च होतात.

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीतील लोकांना महात्मा ज्योतिराव फुले योजनेत वगळण्यात आले. ३४ लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपये २००० साली दिले होते. त्यांनी नीट कर्ज भरले पाहिजे म्हणून आपण प्रोत्साहन देतोय.  तशी योजना केली होती. तिन्ही योजनांचा चार्ट तयार केला आहे. आत्तापर्यंतच्या योजनेत सर्वात मोठी ही योजना आहे. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार मला भेटले,  मी त्यांना आकडेवारी दाखवली. 50 हजार रुपयांची अट काढण्याची मागणी त्यांनी केली. 50 हजारांची मर्यादा एक लाखांपर्यंत वाढवली तर दोन लाख शेतकरी राहतील.  ते सुद्धा राहता कामा नये असे आमदार म्हणाले. व्यापक विचार करायला हवा असे ते म्हणाले.  त्यामुळे आता आपण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपयांचं नियमित अनुदान देणार आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु