Jasprit Bumrah : मुंबई हरल्यानंतर जसप्रीत बुमराह CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन धोनीला म्हणाला…

| Updated on: Apr 16, 2024 | 8:27 AM

Jasprit Bumrah : IPL 2024 च्या सीजनमध्ये रविवारी मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव झाला. एमएस धोनीने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली. 4 चेंडूत धोनीने 20 धावा चोपल्या. सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराह CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता.

Jasprit Bumrah : मुंबई हरल्यानंतर जसप्रीत बुमराह CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन धोनीला म्हणाला...
Ms dhoni - Jasprit Bumrah
Image Credit source: screengrab
Follow us on

वानखेडे स्टेडियमवर रविवारी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. IPL 2024 च्या सीजनमधील मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव आहे. या पराभवानंतर जसप्रीत बुमराह चेन्नई सुपर किंग्सच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा अव्वल गोलंदाज आहे. मुंबईला विकेट मिळवून देण्यासोबत किफायतशीर गोलंदाजी ही बुमराहची खासियत आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराह एमएस धोनीला भेटण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. धोनीच्याच नेतृत्वाखाली 2016 साली जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. सीएसके विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. जसप्रीत बुमराह एका फॅन म्हणून CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीला भेटण्यासाठी गेला होता.

बुमराहला धोनीसोबत फोटो काढायचा होता. तो धोनीच्या शेजारी जाऊन उभा राहिला, सीएसकेच्या टीममधील प्लेयरने दोघांचा एकत्र फोटो काढला. बुमराहने नंतर हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला. ‘माही भाईला बऱ्याच दिवसांनंतर भेटलो, भेटून खूप चांगलं वाटलं’ असं कॅप्शन बुमराहने त्या फोटोला दिलं होतं. CSK विरुद्धच्या सामन्यात बुमराहला धोनीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. सीएसकेचा अव्वल खेळाडू धोनी लास्ट ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला. त्यावेळी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. धोनीने तीन सिक्स मारुन हार्दिकची चांगलीच धुलाई केली.


IPL 2024 मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत बुमराह कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2016 साली धोनीच्या नेतृत्वाखाली जसप्रीत बुमराहने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर बुमराह आपल्या क्षमतेच्या बळावर यशाच्या पायऱ्या चढत गेला. आतापर्यंत 15 आयपीएल सामन्यात जसप्रीत बुमराहने धोनीला तीनवेळा आऊट केलय. IPL 2024 मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत बुमराह सुद्धा आघाडीवर आहे. सध्या तो दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियातील त्याचा सहकारी युजवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.