WTC 2023 : नेट प्रॅक्टिसदरम्यान दिग्गज खेळाडूला दुखापत Watch Video, आयपीएलसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही मुकणार!

IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. प्लेऑफसाठी संघांची चढाओढ सुरु असताना खेळाडूंना दुखापतीच्या घटनाही समोर येत आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या खेळाडूला दुखापत झाली आहे.

WTC 2023 : नेट प्रॅक्टिसदरम्यान दिग्गज खेळाडूला दुखापत Watch Video, आयपीएलसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही मुकणार!
WTC 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलसोबत कसोटी खेळणार नाही!
| Updated on: May 03, 2023 | 12:56 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा साखळी फेरी शेवटच्या टप्प्यात असताना भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. केएल राहुलनंतर आता जयदेव उनाडकट दुखापतग्रस्त झाला आहे. इतकंच काय तर जयदेव उनाडकट आता आयपीएलमधील उर्वरित सामने खेळणार नाही. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स संघाचे धाबे दणाणले आहेत. कारण आता जयदेव खेळणार नसल्याने संघावरील दडपण वाढणार आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचंही टेन्शन वाढलं आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या संघात जयदेव उनाडकट याचा समावेश आहे.

रविवारी नेट प्रॅक्टिस करत असताना जयदेवला दुखापत झाली. या दरम्यान डाव्या खांद्यावर ताण आल्याने वेदना झाल्या. ईएसपीएन क्रिक इन्फोच्या मते जयदेव आयपीएल खेळणार नाही. त्याचबरोब 7 जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही मुकणार आहे.

उपचारासाठी मुंबईत येणार

जयदेव उनाडकट लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने दुखापतग्रस्त भाग स्कॅन करण्यासाठी मुंबईत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे बीसीसीआयचे स्पेशालिस्ट डॉक्टरांचा तो सल्ला घेईल. कारण लखनऊ सुपर जायंट्सने जयदेवला रिलीज करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या सल्ल्यानंतर घेतला आहे.

मुंबई स्कॅन झाल्यानंतर जयदेव उनाडकट बंगळुरुला जाण्याची शक्यता आहे. तिथे एनसीएच्या कॅम्पमध्ये देखरेखीखाली राहील. तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलासाठी फीट करण्याचा प्रयत्न राहील.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल देखील दुखापतग्रस्त आहे. राहुलला झालेली दुखापत नेमकी कशामुळे आहे, हे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर कळेल. पण चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राहुल खेळणार नाही. कदाचित तोही आयपीएल स्पर्धेला मुकू शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.