उनाडकटला पुन्हा संधी नाहीच, नाराज जयदेवने VIDEO शेअर करत बीसीसीआयवर साधला निशाणा

टी20 विश्वचषकाची फायनल खेळून न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळत आहे. पण काही नावांना पुन्हा एकदा वगळण्यात आलं आहे.

उनाडकटला पुन्हा संधी नाहीच, नाराज जयदेवने VIDEO शेअर करत बीसीसीआयवर साधला निशाणा
जयदेव उनाडकट
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 11:55 PM

मुंबई: बीसीसीआयने (BCCI) नुकतंच न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या कसोटी आणि टी20 संघाची घोषणा केली. यावेळी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण 30 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याला यावेळीही संघात स्थान देण्यात आलेलं नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जयदेवने रणजी ट्रॉफी एकट्याच्या जीवावर जिंकवून दिली होती. आताही सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो उत्तम कामगिरी करत आहे. पण तरीही त्याला संधी न मिळाल्याने निराश जयदेवने एक व्हिडिओ शेअर करत थेट बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

रणजी ट्रॉफीच्या 2019-20 मध्ये जयदेवने 10 सामन्यात 13.23 च्या सरासरीने 67 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याच जीवावर त्याच्या सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. तर सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्येही (SMAT) तो शानदार खेळ दाखवत आहे. यावेळीचाच एक फलंदाजीचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

उनाडकटने साधला BCCI वर निशाणा

न्यूझीलंडविरुद्धच्या संघात उनाडकटला स्थान न मिळाल्याने त्याने शुक्रवारी हैद्राबादविरुद्ध 32 चेंडूत 58 धावांची खेळी केलेला व्हिडीओ शेअर केलाय यावेळी त्याने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. दरम्यान या व्हिडीओ त्याने कॅप्शन दिलं आहे की, ‘एक असा वेगवान गोलंदाज जो फलंदाजीही करु शकतो.’ यातून त्याने बीसीसीआयला एक ऑलराऊंडरची गरद असताना ते त्याला संधी देत नसल्याने त्याने जणू टोमणाच दिला आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

हे ही वाचा

Special Report: ‘विराटपर्व’ संपण्याच्या वाटेवर?

सानिया मिर्झाने पाकिस्तानला पाठिंबा देताच भारतीय नाराज, म्हणाले ‘पाकिस्तानातच जाऊन राहा…’

IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण

(Jaydev Unadkat Shares video of his batting to show BCCI that he is also a all rounder)