AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRL : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सचा शतकी झंझावात, आयर्लंडविरुद्ध शानदार खेळी

Jemimah Rodrigues Century : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक हे आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झळकावलं आहे.

IND vs IRL : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सचा शतकी झंझावात, आयर्लंडविरुद्ध शानदार खेळी
Jemimah Rodrigues CenturyImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Jan 12, 2025 | 4:05 PM
Share

वूमन्स टीम इंडिया मायदेशात आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना हा राजरोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने सामन्यात नाणेफेक जिंकली. कर्णधार स्मृती मंधाना हीने फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृतीचा बॅटिंगचा निर्णय सहकाऱ्यांनी योग्य ठरवला. जेमिमाह रॉड्रिग्स हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 370 धावा केल्या. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला.

7 वर्षांनंतर पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

जेमिमाहने 91 बॉलमध्ये 112.08 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या. जेमिमाहने या दरम्यान 12 चौकार ठोकले. जेमिमाहने या शतकासह 7 वर्षांची प्रतिक्षा संपवली. जेमिमाह रॉड्रिग्सच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. जेमिमाहने फेब्रुवारी 2018 मध्ये टी 20I तर 12 मार्च 2018 रोजी एकदिवसीय पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता 2025 मध्ये जेमिमाहने पहिलवहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं.

टीम इंडियाचा हायस्कोअर

दरम्यान टीम इंडियाने 370 धावांसह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाची ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. महिला ब्रिगेडने याआधी विंडीज आणि आयर्लंडविरुद्ध वनडेत 358 धावा केल्या होत्या. वूमन्स टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 24 डिसेंबर 2024 रोजी 5 विकेट्स गमावून 358 धावा केल्या होत्या. तर आयर्लंडविरुद्ध 15 मे 2017 रोजी 2 विकेट्स गमावून 358 धावसंख्या उभारली होती.

मालिका विजयाची संधी

दरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला ही मालिकाही आपल्या नावावर करेल.

जेमिमाह रॉड्रिग्सची शतकी खेळी

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तितस साधू.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, अलाना डालझेल आणि फ्रेया सार्जेंट.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.