PBKS vs SRH IPL 2022: वेळ संपल्यानंतर केन विलियमसनने DRS घेतला? jonny bairstow अंपायरला भिडला

| Updated on: Apr 17, 2022 | 5:34 PM

PBKS vs SRH IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) वाद होणं सामान्य बाब आहे. रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (SRH vs PBKS) सामन्या दरम्यानही असंच घडलं.

PBKS vs SRH IPL 2022: वेळ संपल्यानंतर केन विलियमसनने DRS घेतला? jonny bairstow अंपायरला भिडला
केन विलियमसन DRS वाद
Image Credit source: IPL Screegrab
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) वाद होणं सामान्य बाब आहे. रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (SRH vs PBKS) सामन्या दरम्यानही असंच घडलं. DRS घेण्यावरुन वाद झाला. त्यानंतर पंजाब किंग्सचा फलंदाज जॉनी बेयरस्टोने (jonny bairstow) पंचांसोबत हुज्जत घातली. प्रभसिमरन सिंहबद्दल पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात केन विलियमसनने DRS घेतला. विलियमसनने डीआरएस मागितला, त्यावेळी काउंटरवर 0 अंक दिसत होता. म्हणून हा वाद झाला. विलियमसनने डीआरएस घेण्यासाठीची वेळ संपल्यानंतर डीआरएस मागितला. पंजाब किंग्सचा क्रीझवर उपस्थित असलेला फलंदाज जॉनी बेयरस्टोने याला विरोध केला. पण पंचांनी हैदराबादला रिव्ह्यू घेऊ दिला.

ते LBW साठी अपील करत होते आणि पंचांनी….

विलियमसनच्या या रिव्ह्यूमुळे पंजाब किंग्सच नुकसान झालं. कारण पंचांनी प्रभसिमरनला आऊट दिलं. नटराजनने LBW साठी अपील केलं होतं. पण DRS मध्ये झेलबाद असल्याचं दिसलं. त्यामुळे झेलबाद ठरवलं. तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये बघितलं, तेव्हा चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकिपरकडे गेला होता. विकेटकिपर निकोलस पूरनला चेंडू बॅटला स्पर्श करुन आल्याचं कळलच नाही. ते LBW साठी अपील करत होते. पण पंचांनी झेलबादचा निर्णय दिला.

सामन्याआधी पंजाबला झटका

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाबचा टॉप ऑर्डर फेल ठरलं. कॅप्टन शिखर धवन 11 चेंडूत 8 धावा, जॉनी बेयरस्टो 12 आणि प्रभसिमरन 14 धावांवर आऊट झाला. विकेटकिपर जितेश शर्माने फक्त 11 धावा केल्या. सामन्याआधीच आज पंजाबला मोठा झटका बसला. नियमित कर्णधार मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्याने शिखर धवनकडे नेतृत्व देण्यात आले.