IND vs ENG : टीम इंडियाचं त्रिकुट चमकलं, कसोटी मालिकेआधी गूड न्यूज, इंग्लंडला डोकेदुखी

India Tour Of India 2025 : इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. मात्र आता टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी इंग्लंडचं टेन्शन वाढवलंय.

IND vs ENG : टीम इंडियाचं त्रिकुट चमकलं, कसोटी मालिकेआधी गूड न्यूज, इंग्लंडला डोकेदुखी
Rishabh Pant Shubman Gill Team India
Image Credit source: @imkuldeep18
| Updated on: Jun 10, 2025 | 3:40 PM

इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. त्याआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात आल्या. ही 2 सामन्यांची मालिका 0-0 ने बरोबरीत राहिली. या मालिकेत इंडिया ए चे 3 खेळाडू चमकले. हे खेळाडू इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतही आहेत. त्यामुळे इंग्लंडचं टेन्शन वाढलं आहे. करुण नायर, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या त्रिकुटाने इंग्लंड दौऱ्याआधी शानदार खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या विश्वासात वाढ झाली आहे. तर इंग्लंडची डोकेदुखी वाढली आहे.

करुण नायर याने पहिल्या सामन्यातच द्विशतक झळकावलं. करुणने इंग्लंड ए विरुद्ध 204 धावांच खेळी केली. करुण नायर याला निवड समितीने भारतीय संघात 9 वर्षांनी कमबॅकची संधी दिली. करुणने निवड समितीचा निर्णय पहिल्याच सामन्यात योग्य ठरवला. करुणने यासह पहिल्या टेस्टमधील प्लेइंग ईलेव्हनसाठी दावा ठोकला. करुणने या खेळीसह इंग्लंडचं टेन्शन वाढवलं आहे.

इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी करुणची ही कामगिरी निर्णायक आहे. कारण इंग्लंडमध्ये फलंदाजांना कायम आव्हानाचा सामना करावा लागला आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी निवृत्ती घेतलीय. त्यामुळे या दोघांच्या निवृत्तीनंतर करुणची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

केएलचा शतकी धमाका

केएल राहुल याची फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर केएलने दुसऱ्या अनऑफिशियल टेस्टमध्ये 116 धावांची खेळी केली. केएलच्या या खेळीमुळे टीम इंडियाला कसोटी मालिकेआधी मोठा दिलासा मिळाला आहे.

जबरदस्त जुरेल

युवा विकेटकीपर ध्रुव जुरेल याने दोन्ही सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली. जुरेलने पहिल्या सामन्यात 82 धावांची खेळी केली. ध्रुवने हाच तडाखा दुसर्‍या सामन्यात कायम ठेवत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. ध्रुवनेही प्लेइंग ईलेव्हनसाठी दावा ठोकलाय. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट उपकर्णधार असणाऱ्या विकेटकीपर ऋषभ पंत याला बसवून ध्रुवला संधी देणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

नवा भिडू, नवी साखळी

दरम्यान इंग्लंड दौऱ्याने भारताच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. शुबमन गिल याची कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. शुबमन गिल याला रोहित शर्मा याच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. तसेच टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. त्यामुळे शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत कशाप्रकारे सुरुवात करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.