GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
Vaibhav Suryavanshi Bat: वैभव सूर्यवंशीची बॅट आज RCB विरुद्ध काय कमाल दाखवते याची त्याच्या चाहत्यांनाच नाही तर क्रिकेट जगताला मोठी उत्सुकता लागली आहे. त्याच्या स्फोटक खेळीची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्याच्या बॅटवर अनेकांचा डोळा असल्याचे समोर आले आहे. कोणत्या कंपनीची आहे ही बॅट, किती आहे तिचे वजन?

Vaibhav Suryavanshi Bat: वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या तीनही सामन्यात स्फोटक फलंदाजी केली आहे. आज राजस्थान रॉयल्सचा RCB विरुद्ध सामना आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी काय कमाल दाखवते याची उत्सुकता आहे. त्याच्या शतकाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. चेन्नई सुपर किंग्सविरोधात त्याने 17 चेंडूत 52 धावा ठोकल्या. गुजरात टायटन्सविरोधात त्याने 18 चेंडूत 31 आणि मुंबई इंडियन्सविरोधात 14 चेंडूत 39 धावा केल्या आहेत. पण त्याला अजून शतकी खेळी खेळता आलेली नाही. दरम्यान त्याच्या बॅटवर अनेकांचा डोळा असल्याचे समोर येत आहे. त्याच्या फलंदाजीसोबत त्याच्या बॅटचीही चर्चा रंगली आहे. तो कोणत्या कंपनीची बॅट वापरतो. तिचे वजन किती असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. काय आहे त्याचे उत्तर?
कोणत्या कंपनीची वापरतो बॅट, किती आहे वजन?
वैभव सूर्यवंशीला त्याचे कोच मनीष ओझा यांनी क्रिकेटची ए, बी, सी, डी शिकवली. त्यांनी गेल्या वर्षी टीव्ही 9 नेटवर्कला खास मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी वैभव सूर्यवंशी विषयीची माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी वैभव सूर्यवंशी कोणती बॅट वापरतो याची माहिती दिली. वैभव हा SS कंपनीची बॅट वापरतो. ही कंपनी लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. वैभवच्या बॅटचे वजन हे 1120 ग्रॅम ते 1150 ग्रॅम दरम्यान असल्याची माहिती त्यांनी दिली. एका फलंदाजासाठी बॅटचे वजन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे तो कसदार आणि झोकदार, पल्लेदार फटका मारू शकतो. तर बॅट अशी निवडावी लागते की त्यामुळे कोणतीही इजा होऊ नये.
एका वेळी किती बॅट नेतो सोबत
तर प्रत्येक फलंदाज हा काही एक अथवा दोन बॅट घेऊन कोणताही सामना खेळायला जात नाही, हे जागतिक सत्य आहे. कोणताही फलंदाज कोणत्याही दौऱ्यावर असला तरी तो अधिक बॅट सोबत ठेवतोच. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक फलंदाज हे त्यांच्यासोबत साधारणपणे 10-12 बॅट सोबत ठेवतात. त्यामुळे एक आत्मविश्वासही असतो. तर एखाद्या सामन्यात बॅटचा जम बसला नाही तर दुसर्या सामन्यात फलंदाज बॅट आणि शैली बदलतो. अथवा एकाच सामन्यात तो त्याच्या शैलीनुसार त्याची दुसरी बॅट निवडतो. वैभव सूर्यवंशी सध्या 15 वर्षांचा आहे, एका माहितीनुसार तो त्याच्यासोबत 14 ते 15 बॅट ठेवतो. त्यामागील त्याचा तर्क काहीही असू द्या. पण त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो हे नक्की. काल परवाच्या मॅचमध्ये दिग्गज खेळाडू हार्दिक पंड्याला त्याची बॅट पाहण्याचा मोह आवरला नाही. त्याच्या बॅटमध्ये कोणतीही जादूची पुडी नाही. तर त्याच्या स्फोटक खेळीमुळे तो धावांचा डोंगर उभारतो.