W,W,W,W,W..! पदार्पणाच्या सामन्यातच घेतली हॅटट्रीक, संजू सॅमनसचा संघ पराभूत

केरळ क्रिकेट लीगचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवण्यास मिळत आहे. या स्पर्धेच्या 11व्या सामन्यातही असंच काहीसं घडलं. थ्रिसूर टायटन्सने कोच्चि ब्लू टायगर्सविरुद्ध विकेटने विजय मिळवला. या विजयाचा मानकरी स्पर्धेत पदार्पण करणारा खेळाडू ठरला.

W,W,W,W,W..! पदार्पणाच्या सामन्यातच घेतली हॅटट्रीक, संजू सॅमनसचा संघ पराभूत
W,W,W,W,W..! पदार्पणाच्या सामन्यातच घेतली हॅटट्रीक, संजू सॅमनसचा संघ पराभूत
Image Credit source: INSTAGRAM/KCL
| Updated on: Aug 26, 2025 | 8:07 PM

केरळ क्रिकेट लीग स्पर्धेच्या 11 व्या सामन्यात थ्रिसूर टायटन्स आणि कोच्चि ब्लू टायगर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात संजू सॅमसनने आक्रमक खेळी केली. या सामन्यात थ्रिसूर टायटन्सने शेवटच्या चेंडूवर पाच विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा मानकरी ठरला थ्रिसूर टायटन्सचा अजिनास के… त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे कोच्चि ब्लू टायगर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अजिनास केचा हा पदार्पणाचा सामना होता आणि त्याने त्यात कमाल केली. त्याच्या कामगिरीमुळे सामन्यात विजय मिळवता आला. थ्रिसूर टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कोच्चि ब्लू टायगर्सने फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 188 धावा केल्या आणि विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं. या सात विकेटपैकी पाच विकेट एकट्या अजिनास केने घेतल्या. विशेष म्हणजे यात एका हॅटट्रीकचा समावेश होता. तर दिलेलं आव्हान गाठताना थ्रिसूर टायटन्सने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि विजय मिळवून दिला.

कोच्चि ब्लू टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवाती केली. संजू सॅमसनने 89 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे सुरुवातीला सामन्याच वजन कोच्चिच्या बाजूने होतं. पण अजिनास केने भेदक गोलंदाजी केली आणि कोच्चिला 188 धावांवर रोखण्यास मदत केली. त्याने आपल्या चार षटकाच्या स्पेलमध्ये कोच्चिच्या फलंदाजांना वारंवार अडचणीत आणले. स्पेलमधील शेवटच्या षटकात आणि संघाच्या 18 षटकात अजिनासने सलग तीन चेंडूवर तीन विकेट घेतल्या. यात संजू सॅमसन, जेरिन पीएस आणि मोहम्मद आशिक या खेळाडूंचा समावेश होता. या हॅटट्रीकपूर्वी त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. अजिनास केने 4 षटकात 30 धावा देत 5 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट 7.50 चा होता.

शेवटच्या षटकात थ्रिसूर टायटन्सने मारली बाजी

थ्रिसूर टायटन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. शेवटचं षटक टाकण्यासाठी अखिल केजीच्या हाती चेंडू सोपवला. पहिल्या तीन चेंडूवर प्रत्येकी एक धाव आली. त्यामुळे 3 चेंडूत 12 धावा अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर सिजोमनने उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर त्याने साजेसा फटका मारला आणि चौकार गेला. हा सामना थ्रिसूर टायटन्सने शेवटच्या चेंडूवर जिंकला.