AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पाकिस्तानी फलंदाज नाही…! असं का बोलून गेला शुबमन गिल, आता व्हिडीओ होतोय व्हायरल

आशिया कप स्पर्धेसाठी शुबमन गिलचं टी20 संघात पुनरागमन झालं आहे. त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. 2026 वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. असं असताना शुबमन गिलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात शुबमन गिल नेमका काय म्हणाला ते जाणून घ्या..

मी पाकिस्तानी फलंदाज नाही...! असं का बोलून गेला शुबमन गिल, आता व्हिडीओ होतोय व्हायरल
मी पाकिस्तानी फलंदाज नाही...! असं का बोलून गेला शुबमन गिल, आता व्हिडीओ होतोय व्हायरल Image Credit source: PTI
| Updated on: Aug 26, 2025 | 5:47 PM
Share

आशिया स्पर्धेची जोरदार तयारी झाली असून पुढच्या महिन्यात थरार अनुभवता येणार आहे. 9 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण क्रीडाप्रेमींचं लक्ष पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. हा सामना 14 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वीच शा‍ब्दिक चकमक सुरु झाली आहे. हारिस रऊफने भारताविरुद्ध दोन्ही सामने जिंकू असा दावा केला आहे. असं असताना शुबमन गिलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शुबमन गिल मी पाकिस्तानी फलंदाज नाही असं सांगत आहे. शुबमन गिल या व्हिडीओत सांगत होता की, शाहीन आफ्रिदीने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या उत्तर त्याने असं दिलं. नेमकं तेव्हा काय झालं होतं आणि शुबमन गिल काय म्हणाला होता? शुबमन गिलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शाहीन आफ्रिदीने त्याला बाउंसर मारल्यानंतर हा डायलॉग मारला होता. त्याचं उत्तर त्याने तिथल्या तिथेच दिलं होतं.

शुबमन गिलने सांगितलं की, ‘त्यांचा गोलंदाज गोलंदाजी करत होता. मी पहिला चेंडू खेळण्यासाठी आलो. त्याने बाउंसर टाकला. मी पुल शॉट मारला. पण उशीर झाल्याने चेंडू बॅटच्या हँडलला लागला आणि मिड ऑनला गेला. मग त्याने सांगितलं की हे बांगलादेशचे बॉलर नाहीत. मी काहीच बोललो नाही. पुढच्या चेंडूवर मी फ्लिक करत चौकार मारला. त्यानंतर त्याने मला पुन्हा बाउंसर टाकला. मी त्यावर पूल केला चौकार मारला. त्यानंतर तो मला रागाने पाहून गेला. मी त्याला जाता जाता सांगितलं की, मी पाकिस्तानचा फलंदाज नाही.’

शुबमन गिल पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणखी एक संधी आहे. 14 तारखेला पाकिस्तानविरुद्धच्या सामनयात शुबमन गिल सलामीला उतरणार यात काही शंका नाही. शुबमन गिलचा पाकिस्तानविरुद्ध पहिला टी20 सामना असणार आहे. शुबमन गिलला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची फार काही संधी मिळाली नाही. आतापर्यंत शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध फक्त चार सामने खेळला आहे. त्याने 32.50 च्या सरासरीने 130 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...