AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुबमन गिल याच्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूचं धमाकेदार द्विशतक

शुबमन गिल याच्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एका फलंदाजाने कारनामा केला आहे. या फलंदाजाने द्विशतक ठोकलंय. विशेष म्हणजे याने ही शुबमन इतक्याच म्हणजेच 208 धावांची खेळी केली आहे.

शुबमन गिल याच्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूचं धमाकेदार द्विशतक
| Updated on: Jan 19, 2023 | 11:13 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात शानदार द्विशतक ठोकलं. शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला युवा फलंदाज ठरला. त्याने हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. तसेच शुबमन टीम इंडियाकडून वनडेत द्विशतक करणारा पाचवा बॅट्समन ठरला. आता शुबमननंतर आणखी एका टीम इंडियाच्या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाला ठोकून काढत द्विशतक करण्याचा कारनामा केलाय.

रणजी क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत केरळ विरुद्ध कर्नाटक यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात कर्नाटकाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने द्विशतकी खेळी केली. मयांकने एकूण शुबमनच्या इतक्या म्हणजेच 208 धावा केल्या. मयांकने या खेळीत 17 चौकार आणि 5 सिक्स ठोकले.

मयांकने केलेल्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाला 410 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्नाटकने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हापर्यंत 68 धावांती आघाडी होती. यासह कर्नाटक मजबूत स्थितीत पोहचली आहे.

मयंक गेल्या 9 महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. मयंक शेवटचा श्रीलंका विरुद्ध खेळला होता. त्यानंतर मयंकला संधी देण्यात आली नाही. मंयकचा बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतही समावेश करण्यात आला नव्हता.

मात्र मयंकला आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांना प्रभावित करता आलेलं नाही. दरम्यान मयंकने आतापर्यंत रणजी ट्रॉफीच्या हंगामात 9 डावांमध्ये 72.8 च्या सरासरीने 583 धावा केल्या. यामध्ये 1 शतक, 1 द्विशतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान पहिल्या डावात केरळने 342 धावा केल्या. केरळकडून सचिन बेबीने सर्वाधिक 141 धावांची खेळी केली. तर जलज सक्सेना याने 57 धावांचं योगदान दिलं.

केरळ प्लेइंग इलेव्हन : सिजोमन जोसेफ (कर्णधार), पोन्नन राहुल (विकेटकीपर), जलज सक्सेना, रोहन प्रेम, सचिन बेबी, वत्सल गोविंद, सलमान निझार, अक्षय चंद्रन, वैशाख चंद्रन, MD निधीश आणि रोहन कुन्नम्मल

कर्नाटक प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), रविकुमार समर्थ, देवदत्त पडिक्कल, मनीष पांडे, निकिन जोस, श्रेयस गोपाल, शरथ बीआर (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, वासुकी कौशिक, शुभांग हेगडे आणि विजयकुमार विशक.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.