पोलार्डने काय काम केलं राव, SIX ला थेट कॅच मध्ये बदललं, हा VIDEO बघाच

कॅरेबियाई प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा आक्रमक क्रिकेट पहायला मिळतय. फक्त फलंदाज, गोलंदाजच नाही, तर फिल्डिंगच्या आघाडीवरही खेळाडू आपली प्रतिभा दाखवतायत.

पोलार्डने काय काम केलं राव, SIX ला थेट कॅच मध्ये बदललं, हा VIDEO बघाच
cricket news
| Updated on: Sep 02, 2022 | 1:36 PM

मुंबई: कॅरेबियाई प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा आक्रमक क्रिकेट पहायला मिळतय. फक्त फलंदाज, गोलंदाजच नाही, तर फिल्डिंगच्या आघाडीवरही खेळाडू आपली प्रतिभा दाखवतायत. गुरुवारच्या सामन्यातही हेच चित्र पहायला मिळालं. सेंटू लूसिया किंग्स आणि ट्रिनबॅगो नाइट रायडर्स दरम्यान सामना झाला. या मॅच मध्ये कायरन पोलार्डने एक जबरदस्त झेल पकडला. पहाणारे प्रेक्षकही थक्क झाले. पोलार्डने षटकाराचा चेंडू कॅच मध्ये बदलला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

बॅलन्स संभाळताना कसरत करावी लागली

सामन्यातील 20 व्या षटकात पोलार्डची ही जबरदस्त कॅच पहायला मिळाली. सेंट लूसियाचा फलंदाज अल्जारी जोसेफने जेडन सील्लसच्या गोलंदाजीवर लाँग ऑनच्या दिशेने फटका खेळला. हा खरंतर सिक्सचा फटका होता. चेंडू सीमारेषेपार जाणार होता. त्याचवेळी कायरन पोलार्डने हवेत झेप घेऊन एकाहाताने कॅच पकडली. कॅच पकडताना पोलार्डला बॅलन्स संभाळताना कसरत करावी लागली. त्याने हा झेल घेताना आपल्यातल सर्वोत्तम कौशल्य दाखवलं. ज्यांनी पोलार्डचा हा झेल पाहिला, ते दंग राहिले.

पोलार्डच्या टीमचा विजय

कायरन पोलार्डचा संघ ट्रिनबॅगो नाइट रायडर्सने हा सामना 3 विकेटने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सेंट लूसियाने 20 ओव्हर्स मध्ये 143 धावा केल्या. ट्रिनबॅगोने 7 विकेट गमावून चार चेंडूंआधी हे लक्ष्य गाठले. कॅप्टन पोलार्ड बॅटने विशेष कमाल दाखवू शकला नाही. तो 15 चेंडूत 17 धावा बनवून आऊट झाला. टीमचा ओपनर टियॉन वेबस्टरने 45 चेंडूत 58 धावा फटकावल्या. दुसऱ्याएका सामन्यात सेंट किट्सला बारबाडोसने 7 विकेटने हरवलं. या सामन्यात काइल मेयर्स 73 धावांची इनिंग खेळला. आंद्रे प्लेचरच्या 81 धावांच्या इनिंगचा फायदा झाला नाही.