KKR vs RR : कोलकाताचा थरारक विजय, कर्णधार रहाणेकडून या तिघांना श्रेय, म्हणाला…

Ajinkya Rahane Post Match KKR vs RR Ipl 2025 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या बॉलवर 1 धावेने मात केल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचं श्रेय 3 खेळाडूंना दिलं. रहाणेने यावेळेस काय म्हटलं?

KKR vs RR : कोलकाताचा थरारक विजय, कर्णधार रहाणेकडून या तिघांना श्रेय, म्हणाला...
Ajinkya Rahane Kkr Captain IPL 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 04, 2025 | 9:45 PM

कोलकाता नाईट रायडर्स श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात राजस्थानवर 1 रनने सनसनाटी विजय मिळवला. कोलकाताने राजस्थानसमोर विजयासाठी 207 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानला या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावांची गरज होती. राजस्थानच्या शुभम दुबे याने फटकेबाजी करत सामना शेवटच्या बॉलपर्यंत नेला. राजस्थानला शेवटच्या बॉलवर 3 रन्सची गरज होती. मात्र गोलंदाज वैभव अरोरा याने 1 धाव दिली. कोलकाताने अशाप्रकारे राजस्थानच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. केकेआरने यासह 1 धावेने राजस्थानवर मात केली. केकेआरचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. केकेआरने यासह प्लेऑफमधील आपला दावा कायम ठेवला.

कर्णधार अजिंक्य रहाणे याने केकेआरच्या या विजयाचं श्रेय 3 खेळाडूंना दिलं. रहाणेने त्या खेळाडूंची नावं घेत त्यांना क्रेडीट दिलं. तसेच रहाणेने या थरारक विजयाबाबतही प्रतिक्रिया दिली. रहाणेने नक्की काय म्हटलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

अजिंक्य रहाणे काय म्हणाला?

“जेव्हा तुम्ही एक किंवा दोन धावांनी जिंकता तेव्हा ते तुमच्यासाठी समाधनकारक असतं. रहमानुल्लाह गुरबाज आणि अंगकृष रघुवंशी चांगले खेळले. तसेच आंद्रे रसेल याने अखेरीस जोरदार फटकेबाजी केली. रसेलने शेवट चांगला केला”, असं म्हणत रहाणेने या तिघांच्या खेळीचं कौतुक केलं आणि त्यांना विजयाचं श्रेय दिलं.

रहमानुल्लाह गुरुबाज याने 25 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. तसेच अंगकृष रघुवंशी याने रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 40 रन्सची पार्टनरशीप केली. तसेच अंगृकषने आंद्रे रसेल याच्यासह चौथ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. अंगकृषने या दोन्ही पार्टनरशीपमध्ये निर्णायक भूमिका बजावली. अंगकृषने 44 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसने याने अखेरच्या क्षणी जोरदार फटकेबाजी करत नाबाद अर्धशतक झळकावलं. आंद्रेने 25 बॉलमध्ये नॉट आऊट 27 रन्स केल्या.

केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

दरम्यान केकेआरचा हा या 18 व्या मोसमातील 11 वा सामना होता. केकेआरने 10 पैकी 5 सामने जिंकून 10 पॉइंट्स मिळवले आहेत. तर केकेआरला 4 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे केकेआर 11 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. केकेआरचा नेट रनरेट हा +0.249 असा आहे. केकेआरचा या हंगामातील 12 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 7 मे रोजी होणार आहे.