IND vs ENG: टीम इंडियाला झटका, प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर

IND vs ENG: टीम इंडियाचा (Team India) एक ग्रुप आजच इंग्लंडला रवाना झाला. त्यानंतर संघाला झटका देणारी एक बातमी मिळाली आहे.

IND vs ENG: टीम इंडियाला झटका, प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 16, 2022 | 1:12 PM

मुंबई: टीम इंडियाचा (Team India) एक ग्रुप आजच इंग्लंडला रवाना झाला. त्यानंतर संघाला झटका देणारी एक बातमी मिळाली आहे. उपकर्णधार केएल राहुलशी (KL Rahul) संबंधित ही बातमी आहे. जो वेळेवर फिट होण्यात अपयशी ठरला. पीटीआयच्या वृत्तानुसार दुखापतीमुळे केएल राहुल इंग्लंड दौऱ्याला (England Tour) मुकू शकतो. याआधी सुद्धा हा अंदाज वर्तवण्यात येत होता. केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाहीय, आता फक्त याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. केएल राहुलची रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टी 20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण मालिका सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने दुखापतीमुळे माघार घेतली. राहुल बाहेर गेल्यानंतर त्याच्याजागी ऋषभ पंतला कॅप्टन बनवण्यात आलं. केएल राहुलला ग्रोइन इंजरी झाली आहे. आधी ही दुखापत सामान्य आहे, असं म्हटलं जात होत. पण नंतर राहुल इंग्लंड दौऱ्याला मुकू शकतो, अशी चर्चा सुरु झाली. अखेरीस ज्याची भिती होती, तेच घडलं.

1 जुलैपासून कसोटी सामना

भारत आणि इंग्लंडमध्ये 1 जुलैपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. राहुलची या कसोटीसाठी उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. 20 जूनला टीम इंडियाच्या अन्य सदस्यांसोबत तो इंग्लंडला जाईल अशी अपेक्षा होती. पण दुखापतीने त्याचा मार्ग रोखला आहे. राहुल इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, हे जवळपास स्पष्टच आहे. त्याच्या वनडे आणि टी 20 ते खेळण्याबद्दल सस्पेन्स कायम आहे.

केएल राहुल का महत्त्वाचा आहे?

केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता. रोहित शर्मासोबत सलामीसाठी तो चांगला पर्याय होता. पण आता तो बाहेर झाल्याने टीम इंडियासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय थिंक टँकला राहुलच्या पर्यायाचा विचार करावा लागेल. आता 17 सदस्यीय संघात शुभमन गिल तिसरा ओपनर आहे. गरज पडली, तर मयंक अग्रवालला इंग्लंडची लॉटरी लागू शकते.

असा आहे भारताचा इंग्लंड दौऱ्यातील कार्यक्रम

1 ते 5 जुलै भारत वि इंग्लंड कसोटी सामना

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया पहिला T 20 सामना साउथॅप्टन येथे 7 जुलैला खेळणार आहे.

दुसरा टी 20 सामना 9 जुलैला बर्मिघम येथे होणार आहे.

तिसरा टी 20 सामना 10 जुलैला नॉटिंघम येथे होणार आहे.

3 वनडे सामन्यांची सीरीज 12 जुलैपासून सुरु होईल. पहिला सामना लंडनमध्ये होईल

दुसरा सामना 14 जुलैला लॉर्ड्स येथे होईल.

तिसरा सामना 17 जुलैला मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे होईल.