AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR : Rinku Singh बद्दल ‘ते’ शब्द ऐकताच भडकला शाहरुख खान, म्हणाला, ‘रिंकू बच्चा नाही, तो….’

Shah Rukh Khan On Rinku Singh : शाहरुख खान अनेकदा टि्वटरवरुन आपल्या फॅन्ससोबत चर्चा करतो. या चर्चेदरम्यान एक युजर केकेआरचा प्लेयर रिंकू सिंहबद्दल एक गोष्ट बोलला. त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे.

KKR : Rinku Singh बद्दल 'ते' शब्द ऐकताच भडकला शाहरुख खान, म्हणाला, 'रिंकू बच्चा नाही, तो....'
Kolkata Knight Riders player rinku singh shah rukh khan
| Updated on: Jun 26, 2023 | 2:22 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान मागच्या काही काळापासून टि्वटरवर आपल्या चित्रपटांच प्रमोशन करतोय. पठानच्या रिलीजच्यावेळी सुद्धा त्याने अस केलं होतं. आता ‘जवान’ चित्रपटाच्या रिलीजआधी शाहरुख खान प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भात किंग खानने टि्वटरवर Ask SRK नावाच सेशन चालवलं. याच दरम्यान त्याने कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंह बद्दल एक दमदार टि्वट केलं.

Ask SRK दरम्यान श्रेयस आर्यन नावाच्या एका युजरने शाहरुख खानला प्रश्न विचारला. ‘एक शब्द केकेआरचा बच्चा रिंकू सिंहबद्दल’, त्यावर शाहरुख खानने सर्वांनाच चकीत करणार उत्तर दिलं. ‘रिंकू बाप आहे, बच्चा नाही’ असं शाहरुखने लिहिलं.

ट्विटला जबरदस्त रिस्पॉन्स

शाहरुख खानच्या या टि्वटवर फॅन्सकडून खूप रिएक्शन आल्या. या दमदार टि्वटवर दोन हजारपेक्षा जास्त रिटि्विट झाले. 10 लाख इम्प्रेशन आले. 600 पेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट केलं. 17 हजारपेक्षा जास्त लाइक्स आले.

रिंकूची लक्षात राहणारी इनिंग

रिंकू सिंह शाहरुख खानची टीम केकेआरचा महत्वाचा सदस्य आहे. मागच्या अनेक वर्षांपासून रिंकू कोलकाता नाइट रायडर्स टीमकडून खेळतोय. या सीजनमध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने शेवटच्या 5 चेंडूंवर 5 सिक्स मारुन विजय मिळवून दिला. रिंकून या इनिंगने सर्वांचच मन जिंकलं. त्याशिवाय रिंकू अनेक शानदार इनिंग खेळला. शाहरुखचा पुढचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

शाहरुख खानच्या चित्रपटाबद्दल बोलायच झाल्यास, तो शेवटचा पठान चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. शाहरुख खान लवकरच जवान चित्रपटामध्ये दिसणार आहे. दक्षिणेचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलय. शाहरुख सोबत साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुखचा हा चित्रपट यावर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.