
आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेसाठी शनिवारी 20 डिसेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टीम इंडिया या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. टीम इंडिया गतविजेता आहे.त्यामुळे यंदा भारतासमोर वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेला आता मोजून काही दिवसांचा अवधी बाकी आहे. अशात टीम इंडियाच्या एका खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. तो खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
भारताच्या निवृत्त झालेल्या या खेळाडूने 2021 साली सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्याचं करियर संपल्यात जमा होतं. अशात तो खेळाडू आज न उद्या निवृत्त होणार हे निश्चित होतं.
टीम इंडियाच्या कृष्णप्पा गौतम याने (Krishnappa Gowtham Retirement) निवृत्तीची घोषणा केली आहे. कृष्णप्पा फार दुर्देवी ठरला. त्याला टीम इंडियाकडून फक्त एकमेव सामना खेळण्याची संधी मिळाली. कृष्णप्पाचा पहिलाच सामना हा शेवटचा ठरला. कृष्णप्पाने 2021 साली श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. कृष्णप्पासह तेव्हा संजू सॅमसन, राहुल चाहर, चेतन सकारिया आणि नितीश राणा यांनीही पदार्पण केलं होतं. मात्र कृष्णप्पाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पहिल्याच सामन्यासह कायमचा ब्रेक लागला. कृष्णप्पाने या एकमेव सामन्यात 1 विकेट घेण्यासह 2 धावाही केल्या होत्या.
कृष्णप्पा गौतम याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकाचं प्रतिनिधित्व केलं. तसेच कृष्णप्पा आयपीएलमध्येही खेळला. कृष्णप्पाला लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या 3 संघांकडून खेळण्याची संधी मिळाली. कृष्णप्पा सीएसकेच्या गोटातही होता. मात्र त्याला सीएसकेकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही.
कृष्णप्पाने 59 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 224 विकेट्स मिळवल्या. त्या व्यतिरिक्त कृष्णप्पाने 1 हजार 419 धावा केल्या. या भारतीय फलंदाजाने लिस्ट ए क्रिकेटमधील 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 96 विकेट्स मिळवल्या. तर 630 धावा केल्या. कृष्णप्पाने 92 टी 20 सामन्यांत 734 धावा करण्यासह 74 विकेट्स घेतल्या.
कृष्णप्पा गौतमचा क्रिकेटला अलविदा
Krishnappa Gowtham has announced his retirement from all forms of cricket. pic.twitter.com/IRLXm9GBZ6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 22, 2025
कृष्णप्पाने आयपीएल या जगातील सर्वात लोकप्रिय टी 20i क्रिकेट लीग स्पर्धेत 3 संघांकडून एकूण 36 सामने खेळले. कृष्णप्पाने या 36 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या. तर 247 धावाही केल्या.