Video : कुलदीप यादवने चॅम्पियन्स ट्रॉफीत टाकला बेस्ट बॉल ! जर तसं झालं नसतं तर…

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. विल यंग आणि रचिन रवींद्रने संघाला अपेक्षित सुरुवात करून दिली. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचं आव्हान मिळते की काय? याची चिंता होती. पण फिरकीपटू कुलदीप यादवने सामन्याचं चित्र पालटलं.

Video : कुलदीप यादवने चॅम्पियन्स ट्रॉफीत टाकला बेस्ट बॉल ! जर तसं झालं नसतं तर...
Image Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Mar 09, 2025 | 9:28 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली होती. विल यंग आणि रचिन रवींद्र या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला धक्के दिले. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 57 धावांची भागीदारी केली. त्यामुळे फिरकीला आणण्याशिवाय पर्याय नव्हता. वरुण चक्रवर्तीने हे काम केलं आणि ही जोडी फोडली. विल यंगला बाद केलं. पण रचिन रविंद्रची विकेट खूपच महत्त्वाची होती. कारण या स्पर्धेत शतकी खेळी करून जबरदस्त फॉर्मात होता. त्यामुळे दोन झेल सुटल्याने भारतीय क्रीडाप्रेमींना घाम फुटला होता. त्यात वेगवान गोलंदाजांचं त्याच्यापुढे काही चालत नव्हतं. अशी सर्व स्थिती पाहून कर्णधार रोहित शर्माने चेंडू कुलदीप यादवकडे सोपवलं. पण कुलदीप यादवला या स्पर्धेत फार काही यश मिळालं नव्हतं. त्यामुळे त्याच्याकडून क्रीडाप्रेमींना फार काही अपेक्षा नव्हत्या. पण कुलदीप यादवने सर्वांचे अंदाज फोल ठरवले. कुलदीप यादवने बेस्ट बॉल टाकत रचिन रवींद्रची विकेट काढली. कुलदीपने पहिल्याच चेंडूवर त्याला तंबूत पाठवलं आणि तिथेच धावसंख्येला ब्रेक लागला.

कुलदीप यादवचा हा चेंडू बेस्ट असण्याचं कारण म्हणजे हा फ्लाइट होता. त्यामुळे फलंदाजाला तो आरामात दिसत होता. पण चेंडू अचूक टप्प्यावर पडला. रचिनला वाटला हा चेंडू बाहेर जाईल. पण कुलदीपच्या चेंडून आतल्या दिशेने एन्ट्री घेतली आणि काही कळायच्या आत रचिनच्या विकेट घेतली. रचिनला काही क्षण कळलंच नाही नेमकं काय झालं ते.. पण तंबूत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रचिनची विकेट पडल्याने न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक लागला. रचिन रवींद्रने 29 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. रचिन रवींद्र टिकला असता तर धावसंख्येत भर घातली असती हे मात्र नक्की

आयसीसी स्पर्धेच्या दोन अंतिम सामन्यात कुलदीप यादव खेळला होता. वनडे वर्ल्डकप 2023 आणि टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत खेळला होता. पण त्याला यात एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे त्याच्यासाठी हा स्पेल खूपच खास होता. कुलदीप यादव इथेच थांबला नाही. पुढच्याच षटकात त्याने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्याचा सामना करताना केन विल्यमसन चुकला आणि कुलदीपच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याने पहिल्या 8 चेंडूतच दोन विकेट घेतल्या आणि टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करण्यास मदत केली.