LSG vs RCB IPL 2022: सामन्याआधी RCB ला मोठा झटका, Dinesh Karthik ला काय शिक्षा होणार?

| Updated on: May 27, 2022 | 6:59 PM

लखनौ विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) अचारसंहितेचं उल्लंघन केलं.

LSG vs RCB IPL 2022: सामन्याआधी RCB ला मोठा झटका, Dinesh Karthik ला काय शिक्षा होणार?
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दिनेश कार्तिक
Image Credit source: ipl/bcci
Follow us on

मुंबई: लखनौ विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) अचारसंहितेचं उल्लंघन केलं. बुधवारी कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर (Eden gardens) हा सामना झाला. अचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दिनेश कार्तिकला कानउघडणी करण्यात आली. आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या (Code of conduct) कलम 2.3 अंतर्गत लेव्हल 1 चा नियम मोडल्याचं दिनेश कार्तिकने मान्य केलय. लेव्हल 1 चा नियम मोडला असेल, तर सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बांधिल असतो. कलम 2.3 अंतर्गत लेव्हल 1 हा मैदानावर तुम्ही काय शब्द उच्चारता, त्याच्याशी संबंधित आहे. दिनेश कार्तिकने नेमका कुठला नियम मोडला? ते आयपीएलने स्पष्ट केलेलं नाही. पण बँगोलरच्या डावात आवेश खान शेवटचं षटक टाकत होता. त्यावेळी चेंडूचा बॅटला स्पर्श झाला नव्हता. त्यावेळी रागाच्या भरात कार्तिक स्वत:वरच ओरडला होता. हा गुन्हा त्याच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

कार्तिकने त्या मॅचमध्ये किती धावा केल्या

कार्तिकने लखनौ विरुद्धच्या या सामन्यात 23 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. रजत पाटीदारसोबत पाचव्या विकेटसाठी त्याने 41 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. बँगलोरने या मॅचमध्ये लखनौमसोर विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. आरसीबीने ही मॅच 14 धावांनी जिंकली.

आज करो या मरो सामना

क्वालिफायर 2 च्या सामन्यात बँगोलरचा आता राजस्थान विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जिंकल्या आरसीबीचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल किंवा हरल्यास आव्हान संपुष्टात येईल. दिनेश कार्तिककडून एका महत्त्वाच्या सामन्याआधी अचारसंहितेचे उल्लंघन झालं आहे. सामनाधिकाऱ्यांनी अजून आपला निर्णय सुनावलेला नाही. पण आरसीबी टीमसाठी हा एक झटकाच आहे.