चेन्नई सुपर किंग्स बदलणार कर्णधार! महेंद्रसिंह धोनीकडे धुरा?

आयपीएल 2025 स्पर्धेत 17व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड ऐवजी या सामन्यात महेंद्रसिंह धोनी कर्णधार असण्याची शक्यता आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

चेन्नई सुपर किंग्स बदलणार कर्णधार! महेंद्रसिंह धोनीकडे धुरा?
| Updated on: Apr 04, 2025 | 9:11 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत बरंच काही घडताना दिसत आहे. कोट्यवधींचे खेळाडू फेल जात आहेत. तर नवोदित खेळाडूंचा आक्रमकपणा पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेली चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास झाली नाही. चेन्नई सुपर किंग्सने 3 पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे स्पर्धेत राहायचं असेल तर आता यापुढे विजय खूपच महत्त्वाचे आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला विजय खूपच आवश्यक आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे. संघाचा फलंदाज प्रशिक्षक मायकल हसीने सांगितलं की, महेंद्रसिंह धोनी एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद भुषवू शकतो. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे धोनी कर्णधार म्हणून खेळण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा नियमित कर्णधार ऋतुराज जखमी झाला होता.

मायकल हसीने सांगितलं की, ‘आम्हाला आशा आहे की ऋतुराज आज नेटमध्ये फलंदाजीचा सराव करेल. हे देखील खरे आहे की त्याला सध्या काही वेदना होत आहेत. त्याची दुखापत दिवसागणिक बरी होत आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की तो शनिवारपर्यंत बरा होईल.’ 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडेच्या चेंडूने ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली. चेंडू कोपऱ्याला लागताच ऋतुराज कळवळला होता. पण उपचार केल्यानंतर पुन्हा फलंदाजी केली होती. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळणं कठीण आहे. धोनीचे नाव न घेता हसी म्हणाला की, “तो यष्टीच्या मागे राहतो. त्यामुळे तो चांगले काम करू शकतो. त्याला यामध्ये अनुभव आहे, त्यामुळे कदाचित तो कर्णधारपद भूषवू शकेल. पण मी खात्रीने सांगू शकत नाही.”

दोन्ही संघाचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स संघ: जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, आशुतोष शर्मा, करुण नायर, समीर रिजर्वन, डोमिनो रिझन, डोमिनो रिझन, डॉ. नळकांडे, दुष्मंथा चमीरा, टी नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल, माधव तिवारी.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना, खलील अहमद, मुकेश चौधरी, डेव्होन कोन कॉनवे, रावन कोनवे, राव कोन शेर, नूर अहमद. श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, नाथन एलिस, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी, वंश बेदी, दीपक हुडा